गजानन सोसायटीच्या जागरूक नागरीकांची सभा!
नागपूर :- वाडी नप चा सुधारित D P रिपोर्ट व नकाशा प्रकाशना च्या अनुषंगाने गजानन सोसायटी च्या नागरिकांनी व समितीने प्रस्तुत केलेले आक्षेपानुसार वार्डातील बदल व वाडी परिसरातील सार्वजनिक सुविधा निर्मिती व बदल या संदर्भात ग्रुप वर पूर्व सूचना देऊन मंगळवारी संध्याकाळी हायटेक कम्प्युटर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. जागरूक व अभ्यासू नागरिकानी या चर्चत सामील होऊन आपले अनुभवाचे मत प्रदर्शित करावे ज्या आधारावर पुढे वाडी नप ला वार्डातील डीपी व अन्य नागरिक समस्या,तसेच वाडी परिसरात भविष्यात दवाखाना,शाळा, वाचनालय,समाजभवन,अग्निशमन केंद्र, मुख्य रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने रुंदीकरण, अंतर्गत वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण आदी बाबत चांगले सजेशन मिळतील.मात्र उपस्थिती बाबत अपेक्षित प्रतिसाद दिसून आला नाही.
या सभेत डीपी संघर्ष समितीचे नियंत्रक मधु मानके यांनी उपस्थित वॉर्ड नागरिक व आक्षेप प्रस्तुत कर्त्याना रिपोर्ट व नकाशातील बदल समजून सांगितले. त्या नुसार संयुक्त डीपी संघर्ष समितीने प्रस्तुत केलेले आक्षेप स्वीकार करीत सर्व अंतर्गत मार्ग पूर्वी प्रमानेच ठेवले. फक्त सैनिक चौकातून पुढे प्रबोधन पर्यंत सरळ रस्ता नेण्याऐवजी नालाच्या बाजूनं वळवून तो डाव्या बाजूच्या पहिल्या वळणातून मंगलधाम सोसायटी नामदेव लॉन-कडे 12 मीटर केल्याने गजानन सोसायटीतील 3 घरे सह मंगलधाम या नगरातील घरे अडचणीत येऊ शकतात त्या मुळे पुन्हा आक्षेप व संघर्ष करावा लागणार आहे.
तर वाडी परिसरात सार्वजनिक सुविधा साठी महादेव नगर रोड टेकडी परिसरात 11 एकर शासकीय जागेवर दवाखाना,शाळा, अग्निशमन केंद्र आदी सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात त्या जागेवर या बाबी नकाशात दर्शविल्या नाहीत. तसेच दत्तवाडी मेन रोड ते सैनिक चौका पर्यंत वर्दळ व नागरीकाना होणारा त्रास लक्षात घेता या रोड बाबत नकाशात काहीही बदल दिसून आला नाही. त्याचाही थोडा विस्तार जनहितार्थ व्हावा असे चर्चेत मते मांडण्यात आले व या सर्व बाबी वैयक्तिक व सामूहिक आक्षेप स्वरूपात नप कडे मुदतीत प्रस्तुत करण्याचे ही सभेत निश्चित करण्यात आले.
प्रस्तावना संजय जीवनकर व सभा उद्देश प्रा.सुभाष खाकसे यांनी व्यक्त केले तर उपस्थित जागरूक नागरिकांचे मानसिंग ठाकूर यांनी आभार व्यक्त केले. सभेला व्यवहारे, गुलाहे, मुळे, ताथोड, लांजेवार,रामटेके इ.जागरूक नागरिक उपस्थित होते.