संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नालीचे घान पाणी व मच्छरांचा नागरिकांना भयंकर त्रास
कन्हान :- विवेकानंद नगर प्रभाग क्र ७ येथील एका वर्षापासुन नाली बांधकाम मंजुर असुन सुध्दा बांधका म करण्यात न आल्याने परिसरात घान पाण्याचा व मच्छरांचा नागरिकांना भयंकर त्रास होत असल्याने या नालीचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी नागरिकानी नगरपरिषद प्रशासनाला केली आहे.
नगरपरिषद अंतर्गत नाल्या उघडया न ठेवता वरून बंद किंवा भुमीगत करण्याचे शासनाचे आदेश असताना सुध्दा नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत बहुतेक नाल्या उघडया, नादुरूस्त असुन परिसरात घान पसरवित आहे. याचा एक भाग म्हणजे कन्हान विवेकांनद नगर प्रभाग क्र. ७ येथील मानिक मेश्राम ते घनश्याम लोंखडे यांच्या घराच्या मागे जुनी नाली असु न नालीचे पाणी नालीच्या बाहेर वाहत असुन त्या घान पाण्याचा व मच्छरांचा नागरिकांना भयंकर त्रास होत आहे. परिणामी रोगराई पसरून लहान मुले व वयो वृध्द व्यक्ती बिमार पडत आहे.
तसेच नालीचा घान वास घरापर्यंत येत असल्यामुळे घरात राहणे सुध्दा कठीण झालेले आहे. या बाबत एका वर्षा आधी नगर परिषदे ला अर्ज देऊन नाली बनविण्याची मागणी केली असता. तेव्हा ही नाली बांधकामा करिता मंजुर झालेली आहे. असे सांगण्यात आले परंतु एक वर्ष लोटुन सुध्दा अद्यापही या नालीचे बांधकाम झालेले नाही. करिता या नालीचे बांधकाम त्वरित बांधकाम करुन येथील सर्व नारीकांना होण्याऱ्या त्रास पासुन मुक्त करावे. जेणे करून येणा-या पावसाळयात परिस रात रोगराई चा पसार होणार नाही. असे निवेदन नगर परिषद कार्यालयात प्रभाग क्र.७ विवेकानंद नगर कन्हान येथील त्रस्त नागरिक राजराम श्रीराम मख, माणिक भदुजी मेश्राम, नरेश चिमनकर, तुळशिराम छानिकर, घनश्याम लोंखडे, पांडुरंग दाखोडे, गणपत दमाहे, रामा विठोबा वाघाडे, श्रीमती शोभा भलावी, सुरेखा ठाकरे, ग्यानीधर चनकापुरे, उमाळे आदीनी नगरपरिषद प्रशासना ला मागणी केली आहे.