काटोल :- काटोल शहरी घरकुल योजनेचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन भाजपा शहर अध्यक्ष विजय महाजन यांनी नागरिकांना केले आहे. नगर परिषद हद्दीतील सर्व नागरीकांनी प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) अंतर्गत आपण नवीन घरकुल मंजुरीसाठी https://pmay-urban.gov.in ह्या वेबसाईट वर नजीकच्या C.S.C. सेंटर व सेतु केंद्रावर अर्ज करू शकतो.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतत पाठपुराव्यामुळे महाराष्ट्राला वाढीव प्रधानमंत्री आवास योजना नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात मंजूर करून दिलेली आहे.
तरी या योजनेचा काटोल शहरातील नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, ही विनंती.विजय महाजन यांनी केली आहे नवीन घरकुल मंजुरीसाठी लागणारे कागदपत्रे –
१. अर्जदाराचे आधारशी लिंक असलेले मोबाईल क्रमांक२. अर्जदाराचे आधार कार्ड (आधार क्रमांक, आधारनुसार नाव, जन्मतारीख)३. कुटुंबातील सदस्यांचे आधाा तपशील (आधार क्रमांक, आधारनुसार नांव, जन्मतारीख)४. अर्जदार आधारला लिंक तुम्ही सक्रिय बँक खाते खाते (क्रमांक, अंकाचे नाव, शाखा IFSC कोड)५. उत्पन्नाचा दाखला (वार्षिक ३ लाखा पर्यंत)६. जात प्रमाणपत्र (SC, ST किंवा OBC च्या बाबतीत)७. जमीन दस्तऐवज (सिटी सर्वे उतारा किंवा ७/१२ प्लॉटिंग उताऱ्यासोबत बिनशेती आदेश व बिनशेती ले-आऊट आणि नगर परिषद चे मालमत्ता उतारा (असेसमेंट कॉपी)वरील सव कागदत्रांच्या (Original) मुळ प्रती वेबसाईटवर अपलोड कराव्यात वसंपूर्ण कागदपत्राची एक प्रत नगर परिषद कार्यालय, काटोल येथे जमा करावी तसेच काही समस्या असल्यास आमदार चरणसिंग ठाकुर यांचे जनसंपर्क कार्यालय, रेल्वे स्टेशन, काटोल येथे संपर्क करावा.