नागपुर – मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जीं यांच्या नेतृत्वात जेष्ठ नागरिक व फ्रंट लाईन वर्कस ला कोविड बूस्टर डोज आज पासून मिळत आहे . तरी अनेक ठिकाणी तसेच प्रायव्हेट हॉस्पिटल ला ठरावित रकमेत लसीकरण सुरु झाल्यास अनेक बालकांना,तरुणांना व पालकांना त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी मदत होईल या बद्दल आपण पुढाकार घ्यावा,यासंबंधी भाजपा वैद्यकीय आघाडी नागपुरच्या डॉक्टर्स पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. शासकीय वैद्यकीय कॉलेज मध्ये भेटी दिल्या असता मागील 3 वर्षां पासून MRI बंद, एकच ECG मशीन त्यामुळे सर्वांना बाहेरून तपासणी करायला भाग पाडणे, ऍम्ब्युलन्स असून ती धूळ खात आहे, Basic Life support युक्त ऍम्ब्युलन्स जीं खासदार डॉ. विकास महात्मे सरांनी दिली त्याचा कोणताच उपयोग होत नाही,परिणामी रुग्णांची हेळसांड होते., OPD व अतिदक्षता विभागात जीवनावश्यक औषधं नाहीत, ब्लड बँक मध्ये अनेक मशीन बंद, आयुर्वेदिक रुग्णालयातील परिचारिका यांना मदत, मागील अनेक दिवसापासून अभ्यागत मंडळ बैठक नाही, सायंकाळी 4 नंतर शव विशेदन कक्ष बंद राहणे , तसंच (12-15) वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरु करावे,अश्या अनेक विषयांवर आपण शासनदरबारीं मांडून त्वरित तोडगा काढू असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले, यावेळी श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांना भाजप द्वारा निर्मित अटल आरोग्य कालदर्शिका भेट देण्यात आली
याप्रसंगी भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीशजी सरडे, महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे,महामंत्री डॉ ज्ञानेश ढाकुलकर महिला विंग संयोजिका डॉ कोमल काशीकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते..