मुख्याधिकारी संदीप बोरकर ने केला सामाजिक न्यायाचा जागर

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 2:-सामाजिक न्याय विभागाने नुकतेच निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अंमलात आणली या शासन निर्णयानुसार काल 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामठी नगर परिषद कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देऊन त्या माहिती पुस्तिका वितरित करून सामाजिक न्यायाचा गाजर केला.
याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व सामाजिक न्याय विभागाच्या समतादूत सुनीता गेडाम, उपमुख्यधिकारी नितीन चव्हाण, आबासा मुंडे, लाडे, प्रदीप भोकरे, विजय मेथीयां,माधुरी घोडेस्वार, सारिका परदेसी, माधुरी सेरेकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्व. यादवराव भोयर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Mon May 2 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 2:- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी या न्यासाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. यादवराव भोयर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २ मे २०२२ ला सकाळी ११.३० वाजता संस्थेच्या कामठी येथील शैक्षणिक परिसरातील स्व. यादवराव भोयर मेमोरियल हॉल येथे अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा किशोरीताई भोयर, सचिव सुरेश भोयर तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोयर, अनुराग भोयर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com