मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी संस्थान समितीच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव, केंद्र सरकारची घोषणा

Mon Sep 9 , 2024
– कृषिमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश; महाराष्ट्रात ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मुंबई :-  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com