येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई :- मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रदूषणात वाढ होत असल्याने यावेळी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली. यामुळे मुंबई शहर प्रदूषणमुक्त होवू लागले आहे. येत्या दोन वर्षात मुंबईचा चेहरा बदलण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे मुंबईतील प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिका आणि आय लव्ह मुंबई यांच्यातर्फे मरीन ड्राईव्ह येथे आयोजित सुशोभीकरण प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, माजी मुख्य न्यायाधीश मोहित शांतीलाल शाह, शायना एनसी, जॅकी श्रॉफ आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते फीत कापून वारली पेंटिंग, योग मुद्राचे उद्घाटन करण्यात आले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांनी पाहणी केली.

मुख्यमंत्री शिंदे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन म्हणाले, मरीन ड्राईव्ह येथे सुंदर सुशोभीकरण केले आहे. नाना चुडासामा यांचे सामाजिक काम महत्वपूर्ण असून मुंबईत विविध सुशोभीकरणासाठी त्यांनी हातभार लावला आहे. नाना चुडासामा यांचे काम शायना एनसी पुढे चालवित आहेत. शासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुंबई स्वच्छ, सुंदर आणि हरित बनविण्यात येणार आहे. सर्व रस्ते सिमेंटचे करणार असल्याने खड्डेमुक्त शहर होण्यास मदत होईल. जुलैपर्यंत सी लिंकपर्यंत संपूर्ण काम होईल, कोस्टल रोड, मेट्रो यामुळे नागरिकांना वाहतूक समस्येतून दिलासा मिळाला आहे. शायना एनसीमुळे भायखळा स्टेशनला युनेस्कोचा पुरस्कार मिळाल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला.

योगाचे महत्व अधोरेखित करणारे योगाचे पोस्टर्स आकर्षक असल्याचाही उल्लेख यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आसन - आशय

Fri Jun 21 , 2024
आसनांचे अनेक प्रकार आहेत परंतु सर्वसाधारण व्यक्तिच्या दृष्टिने सर्वच आसने दरदरोज करणे अशक्य आणि अनावश्यक आहे. भोजनासाठी अनेक प्रकारचे पदार्थ उपलब्ध असूनही आपण दररोजच्या भोजनांत काही स्वास्थप्रद पदार्थांचाच अंतर्भाव करतो. त्याचप्रमाणे शरीरास स्वस्थ ठेवण्यासाठी आसने केली जातात. स्वस्थ शरीर म्हणजेच निरोगी आणि कार्यसामर्थ्य प्रवण शरीर. ‘स्वस्थ’ शब्द दोन उपशब्दांपासून बनलेला आहे. ‘स्व’ आणि ‘स्थ’, ‘स्व’ म्हणजे स्वतःचे अथवा प्राकृतिक आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com