मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा आदर-सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन उपराष्ट्रपती महोदयांचा सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अधिवेशनासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था तत्काळ पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिदरी

Thu Dec 12 , 2024
Ø हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात Ø विधानभवन, हैद्राबाद हाऊस, रविभवन येथील व्यवस्थेची पाहणी Ø अधिवेशनासंदर्भात संपूर्ण माहिती ॲपवर उपलब्ध Ø व्यवस्थेमध्ये तृटी राहणार नाही, याची खबरदारी घ्या नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरु होत आहे. अधिवेशनासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तसेच विधानभवन परिसरात प्रशासनातर्फे करावयाच्या व्यवस्था तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com