स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले

मुंबई :- स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. पावनगड (बी 4) येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यानी अभिवादन केले.

मुंबईतील पावनगड येथील शासकीय निवासस्थानी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुण पूष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे,सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, रोहयो मंत्री भरत गोगावले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रभाग 15 तील लाभार्थीना रमाई आवास योजना चा पहिला हप्ता वितरण

Mon Mar 10 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भाजपा प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री आणि नागपुर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार रविवारी संघ मैदान सरस्वती शिशु मंदिर शाळा राम मंदिर समोर मोदी पड़ाव कामठी येथे आयोजित करण्यात आला होता.येथील नागरिकांनी शेकडो निवेदने ना चंद्रशेखर बावनकुळे यांना सोपविली. यावेळी रमाई आवास योजना अंतर्गत पहिला हप्ता पोटी लाभार्थीना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश भाजपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!