विदर्भाच्या रणजी संघाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई :- रणजी ट्रॉफी ही देशातील सर्वात प्रतिष्ठेची आणि मोठी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे मुंबई, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा तीन वेगवेगळ्या संघांचा समावेश असून यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाने शानदार कामगिरी करत जेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ संघाचे विधानपरिषदेत मनःपूर्वक अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, क्रिकेट विश्वचषक जिंकणारा आपला संघ असो, किंवा देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू असोत त्यांचा उचित सन्मान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. खेळाडूंना योग्य सन्मान व पुरस्कार देण्याचे काम राज्य शासन करेल. राज्य शासनाकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

Thu Mar 27 , 2025
– वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री दत्तात्रय भरणे मुंबई :- वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले आहेत. पालकमंत्री पदाची धुरा सांभाळताना वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण, समतोल विकास साधणार अशी प्रतिक्रिया मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!