– छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखत
मुंबई :- ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. त्यांचे विचार जगभरात जनाजनांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा निश्चय राज्य शासनाने केला आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमातून केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ आदी प्रत्येक गोष्ट प्रेरणादायी आहेत. या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले. महाराजांच्या देदिप्यमान कारकिर्दीतील शिवराज्याभिषेक हा सर्वासाठी प्रेरणादायी दिवस असून त्यांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्षे सुरू आहे. या वर्षानिमित्त शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी राज्य शासन राबवित असलेले उपक्रम, महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय, तसेच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यशासनामार्फत करण्यात आलेली तयारी याबाबत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून प्रधान सचिव खारगे यांनी माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव खारगे यांची मुलाखत शनिवार दि.17, सोमवार दि. 19 आणि मंगळवार दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदका पल्लवी मुजूमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR