नागपूर :- 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यामध्ये बदल करण्यात आला असून झालेल्या बदल लक्षात घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
त्यानुसार मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्याचा दिनांक 5 जानेवारी होता. परंतु मतदार यादीचे शुध्दीकरणाचे काम सुरु असल्याने तसेच दुबार, मृत, व स्थलांतरीत मतदारांची नावे कमी करुन मतदार यादीचे शुध्दीकरण करण्यासाठी अंतिम याद्या प्रसिध्द करण्याच्या दिनांकात निवडणूक आयोगाने बदल करुन प्रसिध्दीचा दिनांक 22 जानेवारी करण्यात आला आहे तर दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक 26 डिसेंबरपर्यंत होता, त्यात बदल करुन तो 12 जानेवारी करण्यात आला आहे. मतदार यादीचे हेल्थ पॉरामिटर तपासणे व अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे आणि डेटा बेस अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करण्यासाठी 1 जानेवारी ऐवजी 17 जानेवारी अशी सुधारणा करण्यात आली आहे.
वरील मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमात केलेल्या बदलासंदर्भात 18 डिसेंबरला मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे अध्यक्ष व सचिवांची बैठक घेऊन बदलाबाबत त्यांना अवगत करण्यात येणार आहे. छाचात्रित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमात निवडणूक आयोगाने केलेल्या बदला संदर्भात नोंद घेण्याचे सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.