चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेत दि. १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन राणी हिराई सभागृहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, संजय जोगी व विभिन्न विभागात कार्यरत सर्व अभियंते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले कि, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिनानिमित्त 15 सप्टेंबर रोजी देशात अभियंता दिवस साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्यासह देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या देशातील सर्व अभियंत्यांच्या परिश्रम आणि समर्पणाला समर्पित आहे. नागरीकांच्या सार्वजनिक जीवनात मोठा बदल होण्यास अभियंत्यांचे अथक परिश्रम कारणीभुत आहे. सर विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे अभियंत्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे असून शहरातील नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यात अभियंत्यांची जबाबदारी मोठी आहे.
शहर अभियंता महेश बारई यांनी अभियंता यांच्या कार्याचे महत्व विषद केले.याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्यलेखाधिकारी मनोहर बागडे, अभियंता रवींद्र कळंबे, चैतन्य चोरे, सारीका शिरभाते प्रतीक्षा जनबंधू, प्रगती भुरे, वैष्णवी रिठे,आशिष भारती, अतुल टिकले अतुल भसारकर, प्रतीक देवतळे, राहुल भोयर, अमुल भुते,अमित फुलझेले, सोनू थुल, सिडाम उपस्थीत होते.