चक्रवर्ती सम्राट अशोकाने बुद्ध धम्माला अनुपवर्तीत केले..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपूर/ कामठी – तथागत बुद्धाच्या धम्माला अनुसरून मानवताभिमुख मुल्यांना संवर्धीत करण्याकरीता अनेकानेक विश्व विद्यापिठं, चैत्य, संस्थागार, शिलालेख, यात्री निवास, पानवठे, पशू चिकित्सालय, लोकांच्या हितार्थ आवश्यक सोईसुविधा तसेच चिकित्सालय, पर्यावरण संरक्षण करीता वृक्ष लागवड, औषधीयुक्त झाडे लागवड, धम्माला सातासमुद्रा पलीकडे प्रसारीत करण्याकरीता उपयुक्त भिक्षुगण तयार करून त्यांना योग्य ती साधनं उपलब्ध करून दिली.

आपल्या दोन अपत्यांना परदेशात संघात दिक्षीत करून पाठविले. अयोग्य भिक्खूंना निस्कासित केले, बुद्ध वचनांना कोरून शिल्प तयार केले,

बौद्ध धम्माला राजाश्रय प्राप्त करून दिला, नव्हे तर बौद्ध तत्वज्ञानावर राजा आणि प्रजा आचारशील बनविले. अखंड जंबुदिपावर राज्य करणारे देवांना प्रिय प्रियदर्शी, चक्रवर्ती सम्राट अशोक हे धम्मचक्र अनुपवर्तीत करणारे प्रथम दायाद ठरले, असे उद्गार परमपुज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति दींक्षाभूमीचे विश्वस्त भदंत नाग दिपंकर महास्थविर यांनी व्यक्त केले.

चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३२७ व्या जन्मदिन निमित्त अभिवादनिय कार्यक्रम बोधिमग्गो महाविहार, भदंत बोधिविनीत परीसर, भीमनगर – ईसासनी येथे बोधिमग्गो सेवा संस्था, बोधिमग्गो संडे स्कूल, बोधिमग्गो कम्युनिटी किचन च्या वतीने आयोजित करण्यात आला. उपरोक्त कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव डॉ. भदंत सीलवंस महास्थविर हे होते.

उपरोक्त कार्यक्रमाला भदंत धम्मिको, भदंत जिवनदर्शी, आर्यामग्गा, प्रज्ञा मेश्राम, सिद्धी साखरे, रश्मी पाटील, आचल वासनिक, शांताआई मेश्राम, माधुरी रामटेके, मंगेश पाटिल, अनिल मेश्राम, स्वप्निल गजभिये, प्रिती पाटील, प्रमिला मेश्राम, वंदना मनोहरे, ललिता भिमटे, आशा मेश्राम, संगिता हाडके, दीक्षा काटकर, वैष्णवी बांगर, पार्वती बोरकर, मनिषा पाटील आदी सह उपासक – उपासिका, दायक – दायीका उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना; सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्वावर सुरू

Thu Mar 30 , 2023
मुख्य सचिवांनी साधला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद मुंबई : राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा…कागदपत्रे काय जोडावीत…याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!