अखेर चैतन्य उके चा मुत्यु, सेक्सटॉर्शन’ मुळे आत्महत्या

– युवकाने अपहरण आणि दरोड्याची खोटी काहाणी रचली.

– ग्रामिण भागात सुध्दा सेक्सटॉर्शनचे प्रकरण वाढु लागले.  

कन्हान :- आंबेडकर चौकातुन चैतन्य उके या युवकांचे अपहरण करून पिपरी गाडेघाट रोडवरील पुलावर साठ हजार रूपये हिसकावुन त्यांचे अंगावर पेट्रोल टाकुन जाळल्याची घटना शनिवार (दि.२१) डिसेंबर ला उघडकीस आली होती. परंतु पोलीस तपासात सोशल मीडियाच्या माध्यमातुन चैतन्य उके या वीस वर्षीय तरुणास पैशाची मागणी करण्याच्या धमक्या मिळू लागल्याने ‘सेक्सटॉर्शन’ मुळे बदनामी होईल या भीतीने त्याने स्वतःला जाळुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, उपचारार्थ चैतन्य उके चा मुत्यु झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.

शुक्रवार (दि.२०) आठवडी बाजाराच्या दिवशी रात्री ८.४५ वाजता आंबेडकर चौकातुन चार तरुणांनी त्यांना जबरदस्तीने त्यांच्या दुचाकीवर बसवुन कन्हान गाडेघाट रोडवरील पुलाजवळ नेले आणि आरोपींनी ६० हजार रूपये हिसकुन त्याचे अंगावर पेट्रोल टाकुन जाळल्याचे चैतन्य केशव उके वय २० वर्ष रा. शिवनगर कन्हान यांच्या तोंडी बयाणावरून पो स्टे कन्हान येथे गुन्हा दाखल करून तपास करित तेथील दुकानदाराना विचार पुस केली तर लोकांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. कन्हान हद्दीतील सि.सि.टी.व्ही. फुटेज चेक करण्यात आले. परंतु पेट्रोल पंपवरील सि.सि.टी.व्ही फुटेज मध्ये चैतन्य हा दुचाकीने आला व प्लॉस्टीक बॉटल मध्ये पेट्रोल घेवुन जातांना दिसला. त्यानंतर काही वेळातच आगीची घटना घडल्याने पोलीस पुन्हा रुग्णालयात पोहचुन चैतन्य ला विश्वासात घेऊन चौकशी केली. अगोदर ची माहिती खोटी असुन त्याने सत्य सांगितले. लैंगिक शोषणाला बळी पडुन बदनामी होईल या भीतीने त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतुन पेटवुन घेतल्याची कबुली दिली. चैतन्यने सोशल मीडियाच्या माध्यमातुन मोबाईलवर व्हिडिओ चॅट करत असताना मुलीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. तदंतर चैतन्य ला फोटो पाठवुन पैशाची मागणी करण्याच्या धमक्या मिळु लागल्या आणि पैसे न दिल्यास तो फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू. पैशाची मागणी पूर्ण करू न शकल्याने बदनामी टाळण्यासाठी चैतन्यने आत्महत्येचे पाऊल उचले . मात्र आगीच्या भीतीने त्याने जमिनीवर पडुन आग विझवली. जळजळ होण्याच्या वेदनामुळे त्यांनी एका मित्राची मदत घेऊन रुग्णालयात दाखल झाला. चैतन्य चा मेडीकल नागपुर येथे वैद्यकीय उपचारा दरम्यान मंग़ळवार (दि.२४) ला रात्री ९ वाजता दरम्यान मुत्यु झाला. सदर प्रकरणाची कारवाई एसडीपीओ संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात कन्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील सह कन्हान पोलीस पुढील तपास करित चैतन्य उके ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या आरोपीचा शोध घेत आहे.

सेक्सटॉर्शन’ मुळे चैतन्य उके या युवकाने स्वत: च्या अंगावर पेट्रोल टाकुन जाळुन आत्महत्येचा पर्यंत्न केला. परंतु मेडीकल नागपुर येथे उपचारा दरम्यान मंगळवार (दि.२४) ला रात्री ९ वाजता त्याचा मुत्यु झाला. बुधवार (दि.२५) डिसेंबर ला दुपारी २ वाजता त्यांचे राहते घर शिवनगर कन्हान येथुन अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर दुपारी ३ वाजता शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला.

ग्रामीण भागातही ‘सेक्सटॉर्शन’ चे प्रकरण वाढु लागले 

सेक्सटॉर्शनसारख्या समस्येने आता ग्रामीण भागातही डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील दोन धक्कादायक घटना यावर प्रकाश टाकतात. एका ११ वीच्या विद्यार्थ्याने गळफास लावुन आत्महत्या केली, तर एका २० वर्षीय युवकाने स्वतःला जाळुन आत्महत्या केली. या घटना समाज माध्यमांच्या अनियं त्रित वापराचे गंभीर परिणाम दर्शवतात. सेक्सटॉर्शन म्हणजे समाज माध्यमां वर किंवा गॅझेट्सच्या माध्यमातुन सुरू होणारी फसवणुक, जिथे पीडितांच्या वैयक्तिक किंवा खाजगी माहितीचा गैरवापर केला जातो. आकर्षक ऑफर किंवा भावनिक संवादातुन पीडितांना जाळ्यात ओढुन त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला जातो. त्यामुळे त्यांचे आर्थिक, मानसिक आणि कुटुंबीयांचे नुकसान होते. ग्रामीण भागात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढुन अशा प्रकरणांचे प्रमाण वाढत आहे. गावे जिथे डिजिटल साक्षरतेचा अभाव आहे, तिथे लोक सहज अशा फसवणुकीला बळी पडत आहेत.

सेक्सटॉर्शन प्रकरणांमध्ये लाज आणि भीतीमुळे अनेक पीडित तक्रार नोंदवत नाहीत, ज्यामुळे फसवणुक करणाऱ्यांचा हिंमत वाढते. या पार्श्वभूमी वर, पोलिस आणि सामाजिक संस्थांनी जनजागृती मोहिम हाती घेणे गरजेचे आहे. विशेषतः तरुण पिढीने सावध राहुन समाज माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा. कोणत्याही संशयास्पद संपर्कासोबत संवाद साधण्याआधी विचार करावा आणि फसवणुक झाल्यास त्वरीत पालक किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वेकोलि मुख्यालयाच खासदार बर्वे च्या अ़ध्यक्षेत बैठक संपन्न

Thu Dec 26 , 2024
– रामटेक क्षेत्रातील वेकोलिच्या प्रलंबित विविध समस्या मार्गी लावण्या विषयी चर्चा बैठक कन्हान :- रामटेक क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचे अध्यक्षेत वेकोलि मुख्यालय नागपुर येथे वेकोलि अधिका-यांशी वेकोलि व्दारे प्रलंबित विविध समस्या मार्गी लावण्या विषयी बैठकीत चर्चा करून विविध समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देशित करण्यात आले. मंगळवार (दि.२४) डिसेंबर ला वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड मुख्यालय नागपुर येथे खासदार श्यामकुमार बर्वे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!