कन्हान :- संपुर्ण परिसरात सामाजिक, शासकिय, राजकिय, संस्था, संघटना, विशेषत: युवकांच्य्या पुढा काराने राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांतर्गत ” जय जिजाऊ, जय शिवराय ” चा जय घोष करित मिरवणुकीने जल्लौ षात थाटात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज मना, मनात |
शिवराय जन्मोत्सव घरा, घरात ||
योगराज अवसरे यांचे घरी शिवराय जयंती
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुपर टॉऊन कन्हान येथील शिवश्री योगराज अवसरे यांचे घरी छत्रपती शिवराय जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मराठा सेवा संघ कन्हान समन्वयक शांताराम जळते, माजी सैनिक प्रविण सतदेवे यांचे हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. शिवश्री राकेश घोडमारे हयानी शिव गीत सादर केले. प्रसाद वितरण करून सांगता करण्यात आली. अश्याच प्रकारे सुपर टॉऊन येथील दिपक उघडे, आदी च्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रंसगी मोतीराम रहाटे, जिवन मुंगले, संदीप कुकडे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, चिंटु वाकुडकर, भगवान कडू, विजय बारके, संजय चांहदे, आंनद इंगोले, रीतक मोहबे, सौरभ कोठुरवार, जितेंद्रसिंग जंब्बे, अमोल देऊळकर, स्वप्निल अवसरे, दुर्गेश कडु, हर्ष गुप्ता, चेतन ब्राम्हणकर, अमोल डेंगे सह शिवप्रेमी उपस्थित होते.
पिपरी-कन्हान येथे शिवरायांचा जन्मोत्सव थाटात
हिंदु एकता प्रतिष्ठान कन्हान शहर द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दुर्गा माता मंदिर चौक पिपरी-कन्हान येथे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. प्रामुख्याने उपस्थित आकाश भगत, गौरव भोयर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजां च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. शिवशंभु आखाडा च्या तरुण मुलांनी आणि मुलींनी आपल्या कलेचे प्रदर्शित केल्या. महाप्रसाद वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांद्रीत शोभायात्रा काढुन शिवरायांचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा
शिवशाही ग्रुप कांद्री द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त शोभायात्रेचे आयो जन करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति मेला पुष्पहार अर्पण करुन शोभायात्रा काढण्यात आली. तरुण मुलांनी, मुलींनी आपल्या कलेचे प्रदर्शन करुन यात्रा कांद्री परिसरातील विविध मार्गाने भ्रमण करुन यात्रा छत्रपती शिवाजी चौक कांद्री बस स्टॉप जवळ महाप्रसाद वितरण करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवशाही ग्रुप कांद्री चे संस्थापक अध्यक्ष चेतक पोटभरे, मयुर पोटभरे, दिनेश राऊत, हितेश बागतकर, जैयश वंजारी, आलोक मानकर, मंगेश पारधी, राजेश मांधरे, प्रणय बावनकुळे, ओम कुंभलकर, शुभम मेश्राम, तुषार गिरीपुंजे, दुग्गु माले वार, नेहा बागतकर, पिऊ वंजारी, प्रिया मानकर सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
स्वस्त राशन दुकानात शिवरायांना अभिवादन
शहरातील स्वामी विवेकानंद नगर परिसरात स्वप्नयोग स्वयंसहायता महिला बचत गट पि २३ स्वस्त राशन दुकानात बचतगट सर्व महिला व कार्ड धारक यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित समाजसेविका सौ. शारदा दुधबावने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरूवा त करण्यात आली. समाजसेविका सुनिता मानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उप स्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करित छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरिता स्वामी, वंदना निवाडे, लीला बर्वे, गीता सहारे, बींदु वाघमारे, नेहा तीजारे, शारदा मोहबे, अश्विनी मानकर सह कार्ड धारक प्रामुख्याने उपस्थित होते.
महाप्रसाद वितरण करुन शिवरायांचा जन्मोत्सव थाटात साजरा
अखिल भारतीय मराठा महासंघ द्वारे तारसा रोड चौक येथे महाप्रसाद वितरण करुन शिवरायांचा जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. प्रामुख्याने उपस्थित अखिल भारतीय मराठा महासंघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र धुमाळ आणि सामाजसेविका मोना जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मोनाताई जंगम, शुभांगी घोगले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनावर उपस्थितांना मार्गद र्शन केले. महाप्रसाद वितरण करुन शिवरायांचा जन्मो त्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी इंदिरा धुमाळ, रामकृष्ण धुमाळ, माही मिरचे, शिल्पमं थोरात , माधवी मोरे, प्रमोद थोरात, प्रशांत जंगम, नितेश पाली अमित घारड, शशांक घोगले सह नागरिक उपस्थित होते.
वराडा येथे मिरवणुक आणि महाप्रसादाने शिवरायांचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा
शिवशाही ग्रुप वराडा आणि भारत माता चॅम्पीयन करंभाड यांच्या सयुक्त विद्यमाने पारशिवनी तालुक्या तील वराडा गावात मिरवणुक काढुन आणि महाप्रसाद वितरण करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्स व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
प्रामुख्याने उपस्थित सामाजिक कार्यकर्ता शुभम नागमोते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि ” छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो “, ” जय भवानी, जय शिवाजी ” च्या जयघोष करुन कार्यक्रमाची सुरू वात करण्यात आली. त्यानंतर रंगारंग कार्यक्रम आणि महाप्रसाद वितरण करुन शिवरायांचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शुभम नागमोते, स्वप्निल वरखडे, उमेश मेश्राम, हर्षल नेवारे, आमोल पुस्तकर, हर्षल ठाकरे, उमेश चिखले, बादल मडावी, प्रदीप शिंगणापुरे, अभिषेक पुस्तकर, निचय, नयन सह नागरिक उपस्थित होते.
शिव गर्जना फाउंडेशन ग्रुप वराडा
शिव गर्जना फाउंडेशन ग्रुप वराडा द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित रोशन जामदार, राहुल खोब्रागडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तदंतर गावात भव्य मिरवणुक काढुन विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. महाप्रसाद वितरण करुन शिवरायांचा जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वराडा ग्राम पंचायत सरपंच सुनिल जामदार, पोलीस पाटील संजय नेवारे, प्रणय लंगडे, सतिश लंगडे, हर्षल राऊत, हर्षल फसाटे, मंगेश मरघडे, आयुष ठाकरे, अमित घारड, क्रिष्णा खिळेकर, प्रविण सहारे, राजेश ठाकरे सह गावकरी नागरिक उप स्थित होते.
शिवगर्जना फॉऊंडेशन केरडी
१९ फेब्रुवारी ला शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा केरडी गावात शिवगर्जना फॉऊंडेशन व्दारे प्रबोधनात्मक किर्तन कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शिव गर्जना फॉऊंडेशन केरडी अध्यक्ष सचिव अशोकजी खंडार व शिंदे सेना शाखा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तदंतर प्रबोधनकार, शिवचरित्राकर ह.भ.प. मा.मुरेकर महाराज (नरखेडकर) यांनी आपल्या प्रबोधनातुन उत्कुष्ट शिवाजी महाराज जयंती निमित्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावर प्रबोधनात्मक कीर्तन करून तरुणांना जागृत केलें. याप्रसंगी ग्रा.प. केरडी येथील उपसरपंच पिंटु नितनवरे, ग्रा प सदस्य प्रकाश ठाकरे ग्रा.प.सदस्य नारायण ठाकरे, काठोके, शंकर फलके, राजु खंडार, मुरलीधर खंडार, पुरूषोत्तम ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, चिंधबा खंडार, अनंता मानवटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरि ता शिवगर्जना फॉऊंडेशन केरडी अध्यक्ष सचिन अशो कजी खंडार, आदित्य ठाकरे, सागर खंडार, आशिष फलके, संजय भोयर, चंदु खंडार, योगेश खंडार, अमित खंडार, शुभम खंडार, संदीप खंडार, पियुष खंडार, प्रज्वल खंडार, मंगेश काठोके, प्रणय कोठेकर, बापु राऊत, अनिमेष ठाकरे, महेश काठोके संपूर्ण सदस्य, ग्रामस्थ महिला, पुरूषाने उपस्थित राहुन सहकार्य केले.
एसंबा येथे शिवरायांना अभिवादन
एसंबा-सालवा गावात छत्रपती शिवाजी महारा जांना अभिवादन करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सामाजिक कार्यकर्ता आशिष राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी नरेंद्र राऊत, सुनिल महल्ले, अमोल महल्ले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करित शिवाजी महाराजांचा जन्मो त्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंगेश महाल्ले ,बालचंद धुर्वे, यशवंत महाल्ले, अमोल महल्ले, आशिष राऊत, देवेश महाल्ले, शुभम धुर्वे, गौरव राऊत, तेजस धुर्वे, गौरव महाल्ले, रूपेश राऊत, अभिषेक घरजाडे सह नागरिक उपस्थित होते.