संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कोशिष फाउंडेशन व स्वास्थ वृक्ष फाउंडेशन तर्फे श्री,संत जगनाडे महाराज सभागृह येथे निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर टीकाकरण शिबिर आयोजित करण्यात आले,शिबिरामधे ९ ते२० वयोगटातील मुलिनकरिता आयोजित केले होते,या शिबिरामध्ये १२० मुलिनी लाभ घेतला, डॉ दिपिका चंडोक,यानी आई वडील यांना टिकाकरण चे महत्त्व सांगण्यात आले. ह्या शिबिराचे अध्यक्ष कोशिष फाउंडेशन व स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन अभिषेक चावला ,कार्यक्रमाचे उद्घाटक , राजू थोटे सरपंच, वडोदा , दत्तू हलमारे उपसरपंच वडोदा , विशाल गाडबैल,वनिता इंगोले माजी सरपंच, कार्यक्रमाचे आयोजक अर्चना गाडबैल सदस्या ग्रामपंचायत वडोदा , उपस्थित निखिल बरडे ,संजय पिंपळे ,दिलिप मस्के , संदिप थोटे, विक्की धानोरकर,निकेश निबार्ते , वामन बोबळे,प्रमोद भोयर, दशरथ कारेमोरे, रमेश कडव, गणेश जगताप, कैलास महाकाळकर,सूत्रसंचालन स्मिता सहारे यांनी केले.