युवतींसाठी सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबीर शनिवारपासून

– स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम 

नागपूर :- स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने ४ व ५ नोव्हेंबरला ९ ते २१ वर्षे वयोगटातील युवतींसाठी निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सीताबर्डी येथील सेवासदन हायस्कूलमध्ये हे शिबीर होईल.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. स्व. भानुताई गडकरी संस्था व कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपच्या ज्येष्ठ नेत्या स्व. रुपाताई रॉय यांच्या स्मरणार्थ युवतींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणात्मक उपाय म्हणून ९ ते २१ वयोगटातील युवतींसाठी निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबीर होणार आहे. शनिवारी (दि.४) व रविवारी (दि.५) सकाळी ९ ते ४ या कालावधीत सेवासदन हायस्कूल सक्षम सीताबर्डी याठिकाणी शिबीर होणार आहे. शिबिराचे उद्घाटन शनिवार दि. ४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कॅन्सर एड असोसिएशनच्या डॉ. नुपूर खरे, सेवासदन संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, आमदार प्रवीण दटके, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, स्व. भानुताई गडकरी संस्थेचे पदाधिकारी निखिल गडकरी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, श्रीकांत गडकरी, रमेश मानकर, डॉ. राजीव पोतदार, संजय टेकाडे,दिलीप धोटे तसेच शहर महामंत्री अश्विनी जिचकार, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी-वखरे आदींची प्रमुख उपस्थिती असेल. शिबिरात सहभागी होणाऱ्या युवतींचे सर्व्हायकल कॅन्सरच्या बाबतीत डॉक्टरांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येईल. बालरोगतज्ञ डॉ. गिरीश चरडे यांनी या शिबिराचे संयोजन केले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीरंग वराडपांडे, वर्षा ठाकरे, डॉ. नूपुर खरे, डॉ प्रिया, डॉ. नाझिया, डॉ. अजय, डॉ. आनंद, डॉ. गजभिये आदींचे सहकार्य लाभत आहे. या शिबिरातील नोंदणीसाठी युवतींनी 8208171271 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Squash - Chance of double gold win for Maharashtra team

Sat Nov 4 , 2023
Panaji :- Maharashtra’s men’s and women’s squash teams will have a chance to win a double gold at the National Games. Both the teams will face Tamil Nadu in the final on Saturday. Maharashtra women’s team secured a one sided 2-0 win over Uttar Pradesh in the semifinals. The team consists of Urvashi Joshi, Nirupama Dubey and Anjali. Maharashtra men’s […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com