यशवंत विद्यालय वराडा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

कन्हान (नागपुर) : – वराडा केंद्राअंतर्गत येणाऱ्या जि.प. प्राथमिक नऊ शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा यशवंत विद्यालय वराडा शाळेच्या प्रांगणात नुकत्याच पार पडल्या.

बुधवार (दि.४) जानेवारी ला आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन यशवंत विद्यालय वराडा चे संचालक भुषण निंबाळकर तर प्रमुख अतिथी म्हणुन  किर्ती निंबाळकर मुख्याध्यापिका यशवंत विद्यालय वराडा,  विद्याताई चिखले सरपंच वराडा, नाकतोडे सदस्य ग्रा प वराडा, नेताजी घोडमारे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वराडा प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यार्थ्याना शिक्षणा सोबतच शारिरीक विकास साधण्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्पर्धेचे सुध्दा अत्यंत महत्व आहे. असे मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील यशस्वि वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. या क्रीडा स्पर्धेत वराडा केंद्रातील वराडा, कांद्री , टेकाडी, वाघोली, नांदगाव, एसंबा, बखारी, गोंडेगाव, कोयला खदान आदी ९ शाळेचे जवळपास १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. क्रीडा स्पर्धेत गोंडेगाव, कोयला खदान, बखारी, वराडा या शाळेच्या चमुनी विजयश्री प्राप्त केला. सदर क्रीडा स्पर्धेचे आयोजन केंद्रप्रमुख प्रविण बेंदले हयांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक वामन पाहुणे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रमोद चांदेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कांडलकर, प्रेमचंद राठोड, राजेंद्र गभणे, राकेश गणवीर, सतिश कुथे, मोतीराम रहाटे, रोशन राऊत, दिपक पांडे, अर्चना शिंगणे, निनावे, लांजेवार  हयांनी विशेष सहकार्य केले. तसेच वराडा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक तथा सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षिका यांचे मौलाचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सावित्रीबाई फुले जयंती राजे फाउंडेशनव्दारे रक्तदान शिबिराने साजरी

Thu Jan 5 , 2023
मोतीराम रहाटे, प्रतिनिधी कन्हान (नागपुर) : – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्था टेकाडी द्वारा संचालित राजे फाउंडेशनने टेकाडी गावात रक्तदान शिबिराने थाटात साजरी करण्यात आली.       टेकाडी ग्राम पंचायत नव निर्वाचित सरपंच विनोद इनवाते व माजी ग्रा पं सदस्य दिनेश चिमोटे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com