वाडी :-दिनांक 10 जानेवारी 2023 मंगळवारला वाडी केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत एकूण 15 शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये 49 शिक्षक व 250 विद्यार्थी सहभागी झाले. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन व क्रीडा ध्वजारोहण पंचायत समिती नागपूर येथील गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी रमेश हरडे तसेच पंचायत समिती नागपूरचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रामराव मडावी ,शिक्षण विस्तार अधिकारी शरद भांडारकर, ग्रामपंचायत दवलामेटी येथील ग्राम विकास अधिकारी शिवाजी नागरगोजे प्रमुख अतिथी म्हणून यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मुलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन प्रिया नंदेश्वर व प्रास्ताविक शरद भांडारकर शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख वाडी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत कुमकुम तिलकांनी ,लेझीम पथकाद्वारे तसेच मार्च पास द्वारे करण्यात आले.या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत लोकनृत्यांमध्ये वरिष्ठ गटातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दवलामेटी टोली तर कनिष्ठ गटातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबेडकर नगर यांनी बाजी मारली. शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर थोटे यांनी पंचांना व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेची शपथ दिली यावेळी नायलॉन मांजा वापरणार नाही अशी प्रतिज्ञा उपस्थित सर्वांना देण्यात आली. मैदानाचे पूजन करून खेळाला सुरुवात करण्यात आली. वरिष्ठ गट मुले- डिफेन्स हिंदी या शाळेनी कबड्डी व खोखो , तर मुलींमधून कबड्डी व खो -खो श्रमिक नगर ,लंगडी वाडी, रिले रेस मध्ये डिफेन्स हिंदी शाळा विजयी ठरली कनिष्ठ गट -मुले कबड्डी व खोखो दवलामेटी टोली तर मुली कबड्डी व खोखो डिफेन्स हिंदी तर लंगडी सोनेगाव निपाणी शाळा विजयी ठरली .समूहगीत दवलामेटी टोली तसेच वैयक्तिक खेळांमध्ये डिफेन्स हिंदी व दवलामेटी टोली या शाळेतील विद्यार्थ्यी जास्तीत जास्त विजयी ठरले.
दुपारी चार वाजता बक्षीस वितरणाला अध्यक्ष म्हणून दृगधामना हायस्कूल येथील मुख्याध्यापिका मंदा फाळके व प्रमुख अतिथी अरुण कराळे यांचे शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना स्वरूची भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे आभार जावळकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दवला मेटी टोली येथील मुख्याध्यापक रामेश्वर थोटे, अनिता जावळकर , सीमा महल्ले ,मंजुषा काकडे, काजल खोब्रागडे तसेच डिफेन्स हिंदी येथील मुख्याध्यापिका प्रियदर्शनी मोंदेकर, राबीया शेख व प्रिया नंदेश्वर तसेच केंद्रातील सर्व शिक्षक यांनी मोलाची कामगिरी बजावली.