सांगलीमध्ये चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून केंद्रीय संचार ब्यूरो देणार नवीन फौजदारी कायद्यांची माहिती

– केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा परिषद, सांगली यांचा विशेष उपक्रम

सांगली :- 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय प्रक्रियेचे एक नवे व सुधारित पर्व सुरु झाले आहे. भारतीय न्याय संहिता, 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023, भारतीय साक्ष्य अधिनियम, 2023 या कायद्यांचा फौजदारी कायद्यांमध्ये समावेश आहे.

सदर कायद्यांच्या तपशिलाविषयी जनसामान्य नागरिक, पोलीस विभाग, वकील आणि विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6,7,8 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद सांगली येथे माहितीपर चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनाचे उद्‌घाटन पोलीस अधीक्षक, सांगली संदीप घुगे, यांच्या हस्ते आणि सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती अंकुश धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर प्रदर्शन नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, नव्या कायद्यात अंतर्भूत केलेली नवीन कलमे व त्यांची कार्यपद्धती, ई-एफ आय आर, योग्य वेळेत न्याय, तंत्रज्ञानाचा वापर, न्यायवैद्यक शास्त्राला प्रोत्साहन, साक्षीदारांचे संरक्षण, लहान मुले व महिला सुरक्षा, अभियोजन संचालनालय आदी विषयावरील माहिती मांडण्यात येणार आहे. प्रदर्शनामध्ये क्यू आर कोड लावण्यात येणार असून त्याला स्कॅन केल्यानंतर नवीन कायद्याची संपूर्ण माहिती मोबाईल वर मिळू शकेल.

हे प्रदर्शन सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी, विधी अभ्यासक, पोलीस, वकील आणि नागरीकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडकरींनी बोलावलेल्या लोक दरबारात फक्त जनतेची दिशाभूल ! आक्रमण युवक संघटना

Mon Aug 5 , 2024
– मनपाच्या लोक दरबार कार्यक्रमात गोंधळ ! नागपूर :- रविवारी ४ ऑगष्ट रोजी नितीन गडकरी यांच्या तर्फे नागपूर महानगरपालिका मनपा आयुक्त कार्यालयात लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारामध्ये नागपूर व नागपूरातील बाहेरची जनता मोठ्या प्रमाणात आल्यामुळे स्थानिक प्रशासनाने कुठलेही व्यवस्था समस्याग्रस्त नागरिकांसाठी केली नव्हती. २० जुलैला नागपुरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करिता नागरिक मोठ्या संख्येने मनपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com