अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, प्रा. डॉ. सुशील काळमेघ तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com