जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संस्यांच्यावतीने योग दिन साजरा

यवतमाळ :- जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी संयुक्तपणे योगासने केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.एस.राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, नगर परिषदेचे माजी सभापती अमोल देशमुख, राजू पडगीलवार, शंतनू शेटे आदी उपस्थित होते.

योग दिन कार्यक्रमात जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, पतंजली योग समिती, श्री जनार्धन स्वामी योग्याभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिविंग,भारत स्वाभिमान ट्रस्ट, योग नृत्य परिवार, नेहरू युवा केंद्र, महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित करण्यात आला होता.

भारतीय संस्कृतीची संपुर्ण जगाला दिलेली एक अमूल्य भेट म्हणजे योग होय. माणसाला अंर्तबाह्य निरोगी करून दीर्घायुष्य प्रदान करणारे सामर्थ्य योगात आहे. याच हेतूने जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले. यात योग शिक्षक पूजा शेटे, मिनाक्षी गाढवे, राजश्री धर्माधिकारी, डॉ.विजया कावलकर, माया चव्हाण, अवंती कुबडे, कल्याणी ढोमणे यांनी प्रात्यक्षिक व सुंदर माहिती देऊन सहभागींना माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण यांनी नियमित योग करण्याचा संकल्पाची शपथ दिली.

कार्यक्रमाचे संचालन कीर्ती राऊत यांनी केले तर आभार राजू पडगीलवार यांनी मानले. योग दिनाच्या यशस्वी आयोजनाकरीता संजय चाफले, शंतनू शेटे, दिनेश राठोड, महेश जोशी, मनीष गुबे, जितेंद्र सातपुते, सचिन भेंडे, संजय कोल्हे, अभिजित पवार, अभय धोबे, मनिष डोळसकर आदींनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

24 से 30 जून की अवधि में गोवा में ‘वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सव

Sun Jun 23 , 2024
– संविधान-विरोधी, देशविरोधी शक्तियों को रोकने के लिए हिन्दू राष्ट्र आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिन्दू जनजागृति समिति पणजी (गोवा) :- हमारे देश की लोकतंत्र व्यवस्था अनुसार चुनकर आनेवाले जनप्रतिनिधि संसद में बैठकर देश की जनता के हितों की रक्षा करनेवाले, तथा जनता को सुरक्षा प्रदान करनेवाले कानून बनाते हैं; परंतु जिन्हें भारत का संविधान, संप्रभुता एवं कानून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com