जागतिक परिचारिका दिवस साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस 12मे हा संपूर्ण जगात परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. याच पाश्वरभूमीवर (आज12मे) ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सकाळी 10 वाजता वैद्यकीय अधीक्षक डॉ नैना दुफारे यांच्या मुख्य उपस्थितीत तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांच्या मुख्य उपस्थितीत आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करीत केक कापून जागतिक परिचारिका दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ शबनम खाणुनी यांनी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकीत आपले विचार व्यक्त करीत समस्त परिचरिकाना आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी वर्ग सह आरोग्य कर्मचारी प्रियंका जंगी, स्वीटी रामटेके, रश्मी धस्कर, सुमित्रा वाघमारे, रंजना कौरती, सुषमा दिवांगी, ज्योती धनगर,स्वाती भवसागर, नीलम खोब्रागडे, सीमा नगरारे ,सुनीता तिजारे, सत्यप्रभा मेंढे यासह समस्त परिचरिकागण व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी गन उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Coal Ministry Invites Proposals for Research & Development in Coal Sector

Fri May 12 , 2023
New Delhi :-The Ministry of Coal invites research proposals from Academic Institutions and Research Organizations. Thrust Areas for Research & Development in coal sector includes the following: – (i) Advanced technology/methodology for improvement of production & productivity from underground mining and open cast Mining, (ii) Improvement of safety, health and environmenthttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 (iii) Waste to wealthhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 (iv) Alternative use of coal […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com