भारतीय संविधान दिन साजरा

– संविधान उद्देशिकेचे वाचन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला,याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर व डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. राज्यघटना हि १९५० रोजी लागू झाली असली तरी आजही संविधान लागू करण्याचे उद्देश काय याची अनेकांना माहिती नाही त्यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त अशोक गराटे,उपायुक्त मंगेश खवले, उपअभियंता विजय बोरीकर, सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे,सचिन माकोडे,विधी अधिकारी अनिलकुमार घुले,अनिल बाकरवाले, डॉ.अमोल शेळके,संतोष गर्गेलवार,प्रगती भुरे,सारिका शिरभाते,वैष्णवी रिठे,सारंग निर्मळे,विजय भुरकुंडे,विकास दानव, प्रदीप पाटील,नरेंद्र जनबंधू,गुरुदास नवले तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अतिरेकी हल्ल्यातील पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

Sun Nov 26 , 2023
मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पंधरा वर्षांपूर्वी अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आपली श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व ‘बिगुलर लास्ट पोस्ट’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com