कन्हान ला तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव थाटात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधि

कन्हान : – तथागत गौतम बुद्ध याच्या २५६६ व्या जयंती निमित्य रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व्दारे रविवार ते मंगळवार ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कन्हान येथे तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.
रविवार (दि. १५) मे ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे सायंकाळी ७ वाजता भीम व बुद्ध गीताची प्रस्तुती सादर करून मध्यरात्री १२ वाजता विशाल केक कापुन फटाक्याची गगनभेदी आतिषबा जी आणि तथागत गौतम बुध्दा चा विजय असो च्या जय घोषात तीन दिवसीय बुध्द जयंती महोत्सवाची सुरूवात करण्यात आली.

सोमवार (दि.१६) मे ला सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान ला बुद्ध जयंती निमित्य भदंत के.सी.आर लामाजी यांचे मार्गदर्शनात महापरित्राण पाठ कार्यक्रम करित अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिला ग्रामिण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, रिपब्लिकन सांस्कृतिक संघ अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, पोलीस उपविभागीय अधिकारी मुख्तार बागवान, कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे, सहायक निरि क्षक फुलझेले, ज्येष्ठ नेते कैलास बोरकर, विनायक वाघधरे, भगवान नितनवरे आदी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . सायंकाळी ७ वाजता प्रबोधनात्मक आणि सुगम संगीत म्युझिकल आर्केस्ट्रा चा कार्यक्रम करण्यात आला. मंगळवार (दि.१७) मे ला सायंकाळी ७ वाजता भव्य धम्म रैली पंचशील नगर महाविहार सत्रापुर कन्हान येथे बुद्ध वंदनेने सुरूवात करून भव्य धम्म रैली मध्ये अखाडा, संदल, बँड पार्टी, लेझीम पथक, डी.जे, नाट्य पथक, महापुरुषाचे तैलचित्र यात तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा मुख्य आकर्षणाचे केंद्र असुन महामार्ग क्र.४४ ने भ्रमण करित डॉ बाबासाहेब आंबेड कर चौक येथे अखाडयाचे कला कौशल्य सादर करित तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करित धम्म रैली पुढे मार्गक्रम करित नाका नं. ७ येथील सुजाता बुद्ध विहारातील तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून महाप्रसाद वितरण करित भव्य धम्म रैलीचे समापन करण्यात आले. या भव्य धम्म रैली चे चौका चौकात विविध सामाजिक संघठना द्वारे शरबत व भोजन वितरण करून स्वागत करण्यात आले. कन्हान च्या तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजक रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, ज्येष्ठ कैलास बोरकर, बुद्धिष्ट वेल्फेअ र सोसायटीचे भगवान नितनवरे, विनायक वाघधरे, सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम गजभिये, मनोज गोंडा णे, चेतन मेश्राम, रमेश गोडघाटे आदी मान्यवरांचे सह कार्य लाभले. बुध्द जयंती महोत्सवाच्या यशस्विते करि ता रोहित मानवटकर, पंकज रामटेके, विवेक पाटील, विनोद बावनगडे, पृथ्वीराज चव्हाण, अश्वमेघ पाटील, निखिल रामटेकेे, शैलेश दिवे, अभिजीत चांदुरकर, अखिलेश मेश्राम, विजय नगरारे, आर्यन भिमटे, महेश धोंगडे सह अनेक भीम सैनिकानी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोळसा ट्रक ने पायदळी दोन इसमाना धडक मारल्याने एक मुत्यु तर एक जख्मी

Thu May 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – अण्णा मोड डुमरी येथुन गोंडेगाव खुली कोळसा खदान ला कोळसा भरण्याकरिता जाणा-या ट्रकने पोलट्री फार्म कडे जाणा-या दोन पायदळी व्यकतीने जोरदार धडक मारल्याने रंजित डेहरिया चा घटनास्थळीच मुत्यु झाला तर रोहीत डेहरिया जख्मी झाला. बुधवार (दि.१८) ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान अणा मोड डुमरी वरून सामान घेऊन पायदळ येत असताना नांदगाव पोलट्री फाम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!