पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

– मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

– मनपाचे नागरिक व गणेशोत्सव मंडळांना आवाहन

नागपूर :- “श्री” गणरायाचे येत्या ७ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव संपूर्णतः पर्यावरणपूरक साजरा करण्यात यावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना व गणेशोत्सव मंडळांना केले आहे.

शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता सर्व मूर्तीकार कलावंतानी नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत नोंदणी/परवाना घेणे आवश्यक आहे. याशिवाय यावर्षी पीओपी गणेश मूर्तीची निर्मिती, विक्री आणि खरेदीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवास प्राधान्य देऊन घरी मातीच्या च मूर्तीची स्थापना करा, असे आवाहन मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, उच्च् न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाखल याचिकाक्र. 3/2021 च्या आदेशान्वये केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दि. 12 मे 2020 च्या मार्गदर्शक सुचनाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. यंदा येत्या ०७ सप्टेंबर रोजी श्रीगणेशाचे आगमन सर्वत्र होत असून, गणेशोत्सव मोठया उत्साहानेसाजरा करण्यात येणार आहे. यावर्षी गणेशोत्सव पर्यावरणपूरक होणाच्या दृष्टिनेशहरातील सर्व नागरिक, भावीक, मूर्तीकार तसेच कलावंताना काही निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे.

यात सर्वप्रथम सर्व मूर्तीकार कलावंतानी पर्यावरणपूरक मूर्तीची निर्मिती करण्याकरीता मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोंदणी/परवाना घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी शहरातील जलाशयाचे प्रदुषण रोखण्यासाठी पी.ओ.पी. मूर्तीची स्थापना करू नये, पर्यावरणपूरक साहित्याने निर्माण केलेल्या मातीच्या मूर्तीची स्थापना करावी, मूर्तीकारांनी घातक व अविघटनशील रासायनीक रंगाचावापर करण्यास प्रतिबंध करण्यात आले असून, पर्यावरण पूरक रंगाचा वापर करावा.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध २०२४ च्या गणेशोत्सवा करिता असणार नाही. तरी गणेश विसर्जन फक्त कृत्रिम तलावामध्येच करावयाचे असल्याने, ज्या सार्वजनिक मंडळाचेगणेश मूर्ती 4 फुटापेक्षा अधिक असतील त्यांनी विसर्जनाची व्यवस्था महानगरपालिका हद्दीच्या बाहेर करावी व तसे संबंधीत पोलिस विभागाला काळवून रितसर मिरवणुकीची परवानगी घ्यावी. घरघुती गणेश मूर्तीसाठी या अगोदर 2 फुट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती, तरी यावर्षी घरगुती गणेश मुर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही. परंतु, घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखुशीने 2 फुट उंचीची मर्यादा पाळावी. असे आवाहन ही डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.

मनपा क्षेत्रातील संपूर्ण तलावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंध करण्यात येणार असून, नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, मूर्तीच्या सजावटी करीता प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करु नये, अवैद्य विनापरवाना मूर्तीची निर्मिती, भांडारण, वापर व विक्री करीत असल्यास तसेच मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्यास रु. 10,000/- दंड/शास्ती आकारण्यात येणार आहे. याची दक्षता मूर्तिकारांनी घ्यावी असेही डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Multi-Media Expo by Maha Metro, NMC, Central Bureau of Communication 

Wed Aug 14 , 2024
• Har Ghar Tiranga, Partition Horror Themed Expo at Sitabuldi Interchange   NAGPUR :- Maha Metro, Nagpur Municipal Corporation (NMC) and Central Bureau of Communication have jointly organized 3-day expo on Har Ghar Tiranga, Azadi ka Amrut Mahotsav (AKAM), partition Horror Remembrance Day at Sitabuldi Interchange. The exhibition was inaugurated by Municipal Commissioner Abhijit Chaudhari, today and will continue till 15th […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!