नागपूर :-“आकार मल्टीपर्पज फाऊंडेशन आणि जैन हेरिटेज केंब्रिज स्कूल फेटरी” नागपुरच्या वतीने प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसोबत गीत गायन स्पर्धा, अध्यात्मिक प्रबोधन, फिंगर पेंटिंग, कोमेडी व अभिनयाचे प्रात्यक्षिक करून मोठ्या उत्साहात “संविधान दिन” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आकार फाउंडेशनच्या संचालिका अनिता मसराम आणि जैन हेरिटेज स्कूलच्या प्राचार्या  मोनिका रतनपार्ज यांनी व शाळेव्यतिरिक्त बाहेरूनही स्पर्धक व श्रोते सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात […]

नागपूर :- समाज कल्याण विभागाअंतर्गत 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 01 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात अनुसूचित जाती स्वयंसहायता युवा गट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेत एकूण 23 युवागटातील 114 लोक उपस्थित होते. त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. बार्टीतर्फे हायटेक आणि ईडीपीच्या यशस्वी […]

नागपूर :- भारतीय विज्ञान परिषदेचे ( इंडियन सायन्स काँग्रेस ) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यम समन्वयासंदर्भात आढावा बैठक नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू एस.आर.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विज्ञान परिषदेचे स्थानिक सचिव जी.एस. खाडेकर, राजेश सिंग, जिल्हा […]

भंडारा :- शेतकऱ्यांना आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत अजुनही 30 हजार शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही. आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी 7 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर 7/12 उतारा, आधार कार्ड, बॅक पासबुकची […]

भंडारा :- भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2022 पासून मतदार कार्ड सोबत आधार कार्ड जोडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 10 लाख 14 हजार 330 मतदार असून त्यापैकी 6 लाख 56 हजार 331 मतदारांनी मतदार कार्ड सोबत आधार कार्ड जोडणी केली आहे. 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व 1 हजार 205 मतदान केंद्रावर तसेच मतदार नोंदणी […]

नागपूर :-ब्लड फॉर बाबासाहेब 6 डिसेंबर रोजी या अभियानांतर्गत महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण जगभरात ऐच्छिक रक्तदान करून बाबासाहेबांना एक विशाल अभिवादन करण्यात येईल. अशी माहिती पत्र परिषदेमध्ये आतिश मेश्राम व प्रवीण कांबळे यांनी दिली. यासाठी जगभरातून 500हून अधिक विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लाखोच्या संख्येने लोक एकत्र येत आहेत. रक्तदानाच्या माध्यमातून मानवी समाजातील नैसर्गिक, समता प्रस्थापित करणे, भारतीय समाजातील स्वातंत्र, समता, बंधुता, […]

रामटेक :-देवलापार पोलिसांनी मोठी कारवाई करीत अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून त्यात क्रूर व निर्दयपणे कोंबून ठेवलेला १९ गोवंशांना जीवनदान दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी हे १ तारखेला सकाळच्या सुमारास देवलापार पोलीस स्टेशन क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पोलीस पथकासह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना काही इसम विनापरवाना व अवैधरित्या गोवंश कोंबून वाहतूक करीत असल्याची […]

नंदिनीच्या जिद्दीला सलाम, जागृत जेष्ठ नागरिक कमेटी तर्फे राजनंदिनी देहेरिया हिचा सत्कार. सावनेर :- सावनेर येथील 10 वी वर्गातिल राजनंदिनी देहेरिया हिने केलेल्या धाड़सी कार्याकरिता हिचा जागृत जेष्ठ नागरिक कमेटी तर्फे सम्मान पूर्वक सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ चे आयोजन माज़ी नगर सेवक बाबा शेळके यांनी तेजसिंग राव भोसले सभागृह येथे केले. या वेळी  लीला चितळे, जेष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्य संग्राम […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी आत्महत्या करण्यामागचे गूढ कायमच गोंदिया :- जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गोटाफोडी हद्दीतील आवरीटोला जंगल परिसरात एका इसमाने झाडाला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना आज सकाळी उघडीस आलेली आहे. सदर गळफास लावून आत्महत्या करणा-या मृतक इसमाचे नाव लक्ष्मण नाईक वय 44 वर्षे आहे. गळफास लावून आत्महत्या का? बरं केली हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच […]

बेला :- आठ – दहा कि.मी. अंतरावरील पिपरा व मानोरीचे पाचवी ते सातवीतील अंदाजे 30 चिमुकले थंडीतही सकाळी शाळेत बेला येथे येतात. मात्र ,त्यांना शाळा सुटल्यानंतर घरी परत जाण्यासाठी 11.30 वाजताची बेला येथून बस नाही. त्यामुळे ते चिमुकले शाळेचे दोन तास पाडून सकाळी 10 वाजताच गावाकडे निघून जातात. यामध्ये त्यांचे गेल्या 7-8 महिन्यांपासून खूप शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात ,18 […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजीत स्वच्छता अभियान लीग स्पर्धेअंतर्गत योग नृत्य परिवार संजय नगरतर्फे २७ नोव्हेंबर रोजी जनजागरण रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या जनजागरण रॅलीस आयुक्त विपीन पालीवार, माजी उपमहापौर राहुल पावडे, गोपाल मुंदड़ा यांनी भेट दिली. रॅली पुर्वी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयुक्त विपीन पालीवार, माजी उपमहापौर राहुल पावडे, गोपाल मुंदड़ा यांनी […]

मुंबई :- महाराष्ट्र शासनाने लाड व पागे समितीच्या सिफारिशच्या संरक्षण करण्यासाठी व पागे समिती शिफारसींची अमलबजावणी करिता उपमुख्यमंत्री सहकॅबिनेट मंत्री यांच्या समावेश करून समिती नेमली. या समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक करून विशेष पुढाकार घेतला व सफाई कामगारांप्रति आपली संवेदनशीलता दाखवून स्वतः होऊन समितीचे अध्यक्षपद स्वीकारले. याकरिता SBM विकास सेवा संस्था तर्फे संस्था चे अध्यक्ष सतीश सिरसवान यांच्या […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजीत स्वच्छता अभियान लीग स्पर्धेअंतर्गत योगनृत्य परिवारातर्फे भिवापूर वार्ड येथील ओमनगर परिसरात १ महीना स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर योगनृत्य परिवाराचे संस्थापक गोपाल मुंदडा, केंद्र प्रमुख कविता कुरेवार यांच्या सहकार्याने ४ नोव्हेंबर पासुन स्वच्छता कार्याला सुरवात करण्यात आली. परिवारातील महीला सदस्यांनी पावडे, घमेले यांच्या सहाय्याने नागमंदिर परिसर व योगनृत्य परिसर येथे साफसफाई […]

नागपूर :-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचयात स्तरावर विविध वैयक्तिक लाभाची व सार्वजनिक स्वरुपाचे कामे केली जातात. मनरेगा अंतर्गत सध्या राज्यात 38 हजाराहून अधिक कामे सूरु आहेत. कळमेश्वर तालुक्यातील म्हासेपठार व लोहगड ग्रामपंचायतीअंतर्गत चालू असलेल्या काही कामांना मनरेगा आयुक्त शान्तनु गोयल, (भाप्रसे ) यांनी आकस्मिक भेट दिली.सदर भेटी दरम्यान आयुक्तांनी म्हासेपठार व लोहगड ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवड, पेव्हर […]

काटोल :- काटोल नगर परिषद क्षेत्रातील मारामाय नगर व अर्जुन नगर मधील रेल्वे लाईनच्या दोन्हीं बाजूला असलेल्या रहिवासी नागरिकांना रेल्वे सीमारेषेच्या आत असल्याचे कारणांस्तव 10 दिवसाचे आत घरे खाली करण्याकरिता नोटीस बजावण्यात आल्या होत्या,नागरिकांनी नागपूर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. चरणसिंग ठाकूर यांनी विलंब न लावता 30.11.2022 ला मंडल प्रबंधक मध्य रेल्वे नागपूर […]

नागपूर :- जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांनी 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भावी मतदार(प्रि-व्होटर) म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक तसेच शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल […]

नागपूर :- आत्मत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास दिलासा देण्यासाठी कुटुंबातील सदस्यावरील कर्ज थकीत असल्यास तपासाअंती त्यांचे प्रकरण प्राधान्याने पात्र ठरविण्यात यावे. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या व प्रकरणांची गंभीरता जाणून घेवून तत्काळ मार्गी लावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिल्या. शेतकरी आत्महत्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (1) रोजी शोध पथकाने 197 प्रकरणांची नोंद करून 131100 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

गमावलेला विश्वास उद्धव ठाकरेंनी पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करावा मुंबई / पुणे :- राज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनातील विश्वास गमावला आहे.अनेक आमदार, खासदार, कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.अशात एकाकी पडलेला ठाकरे गट आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ‘भीमशक्ती’चा आधारे घेत आहे.ठाकरे यांनी भीमशक्तीला जरूर सोबत घ्यावे,त्यामुळे राज्यात नव राजकीय समीकरण निर्माण होईल, […]

नागपूर :- नागरिकांच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिका व ओसीडब्ल्यू यांच्या वतीने गणेशपेठ भागात जलकुंभ उभारण्यात येत आहे. या जलकुंभामुळे परिसरातील नागरिकांना २४ बाय ७ पाणीपुरवठा मिळणार आहे, काही लोक जलकुंभावरून चुकीची माहिती देत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याची माहिती माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांनी दिली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेच्या अमृत योजनेंतर्गत ओसीडब्ल्यूद्वारे गणेशपेठ भागात जलकुंभ उभारण्यात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com