नागपूर : अंबाझरी तलावात 19 मुले पोहताना पाण्यात बुडाली… अशी वार्ता जणू काही वाऱ्यासारखी परिसरात पसरली…. पोलीस स्टेशनला दूरध्वनी करण्यात आला… जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासही सूचना देण्यात आली… राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलास पाचारण करण्यात आले… तातडीने दलाची कार्यवाही सुरू झाली… अथक प्रयत्नानंतर आपत्ती प्रतिसाद दलास मुलांना वाचविण्यात यश आले… एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असा हा थरार…आकांत…अन सुटकेचा निःश्वास अनुभवायला मिळाला […]

मुंबई :- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

नागपूर :- संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, सहआयुक्त हरिश भामरे यांच्यासह अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

संत सेवालाल यांचे कार्य आज प्रासंगिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  मुंबई :- थोर संत सेवालाल महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी पाण्याचा अपव्यय न करण्याचा तसेच पाणी जपून वापरण्याचा संदेश दिलेला विचार आजच्या युगात विशेष प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि. ७) बंजारा भाषेतील संत मारो सेवालाल या चित्रपटाच्या पोस्टर, माहितीपत्रक व टीजरचे […]

नागपूर :-  नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL), नागपूर महानगरपालिका, जागतिक संसाधन संस्था (WRI) आणि ICLEI- दक्षिण आशिया यांच्या संयुक्त विद्यमाने “झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर (ZCBA)” प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  चिन्मय गोतमारे प्रामुख्याने उपस्थित होते. झिरो […]

नागपूर :-राष्ट्रीय कॉन्ट्रैक्टर लेबर यूनियन जोडा अभिनयाच्या तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष विजय पटले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 06 डिसेंबर 2022 मंगळवारी कलमेश्वर बस स्टॉपच्या जवळ गजानन मंदिर (नागपुर ) येथे मीटिंग झाली असून ज्यामध्ये आमचे कांटेक्ट लेबर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना या यूनियन मध्ये जोडण्यासाठी व यूनियनच्या फायद्यासाठी ठेकेदार ज्या प्रॉब्लम मध्ये येत आहे. घर मालक जे तुम्हाला प्रॉब्लम देत आहे. […]

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत २०२३ अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे विजेते घोषीत करण्यात आले असून लवकरच त्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. जिंगल, पथनाट्य,म्युरल आर्ट, शॉर्ट मुव्ही, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.    जिंगल स्पर्धेत प्रथम नंदराज जीवनकर, द्वितीय अभिषेक कपूर, तृतीय क्रमांक प्रतीक रामटेके यांनी प्राप्त […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (7) रोजी शोध पथकाने 151 प्रकरणांची नोंद करून 64400 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

भंडारा :-  सैनिक देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतात. कुटुंबापासून दूर राहून आपले संरक्षण करीत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधीच्या संकलानाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.जिल्ह्याचा ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात आयोजित करण्यात आला […]

देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे योगदान महत्वाचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  मुंबई :- सन १९६५ साली भारताने पाकिस्तानवर विजय प्राप्त केल्यावर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ हा नारा दिला होता. आज अनेक दशकानंतर देखील भारतीयांमध्ये संरक्षण दलांप्रती अतिशय आदराची भावना आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे सैन्य दलातील हुतात्म्यांचे […]

मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अशोक खरटमल, आनंद साबळे, अंबादास केदारे, सुरेश गायकवाड आदी […]

पारशिवनी :- पारशिवनी तहसिल कार्यालयात आम आदमी  पार्टी चे पाराशिवनी चे जिला सह संयोजक फजितराव कोरडे याचे नेतृत्वात पारशिवनी चे तहसिलदार प्रशात सागळे याना विविध मागणी चे निवेदन दिले या प्रसंगी निवेदन देतानी  जिल्हा सह संयोजक फजितराव कोरडे, शाम खंडाळकर, राजेन्द धुदें, शंकर भोगें. माधव गोरले, दामोधर राऊत,गजानन कोरडे, शेषराव कोहळे, विजय जैस्वाल, गणेश कोहळे, विष्णु वानखेडे, किशोर चोधरी, रोशन […]

पारशीवणी :- रमाई बुद्ध विहार पारशिवनी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्ण कृती पुतळ्यास माल्यर्पण करण्यात आलें व विविध वक्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनावर मार्गदर्शन केले व ‘ब्लड फॉर बाबासाहेब, या अभियान अंतर्गत चला आमी सारे भारतीय मिळून रक्तदानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकराना, समाजासाठी तुज रक्त वाहू दे, मला तुझ्या रक्तामधला भीम पाऊ दे,या बोध वाक्याचा […]

गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त मुंबई :- भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे, अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतीक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे, असे उद्गार वन व सांस्कृतिक […]

मुंबई :- महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहेच. शिवाय अमेरिकन उद्योगांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. या पुढील काळातही राज्याला उद्योग क्षेत्रात अधिक आघाडीवर ठेवण्यात अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य मोलाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वांद्रेतील जियो कन्व्हेन्शन सेंटर येथे अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (‘AMCHAM’)चे ॲपेक्स कॉन्क्लेव्ह झाले. यावेळी राजदूत एलिझाबेथ जोन्स, राष्ट्रीय […]

नवीन नगरपालिका नागरी विकासामध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल मुंबई :- पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेमध्ये […]

– राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त सायकल मॅरेथॉनचे आयोजन नागपूर :- वाढत्या प्रदूषणा संदर्भात जनजागृती व्हावी याकरिता दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL), नागपूर महानगरपालिका, महामेट्रो आणि MYBYK यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. वाढत प्रदूषणावर आळा बसविण्यासाठी आणि शहरात होणाऱ्या […]

– मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- नागपूर शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारस्यासह कलेचा वारसा लाभला आहे. याच वारसाला नागपुरातील चित्रकारांनी जतन करण्याचे कार्य मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेच्या माध्यमातून केले आहे. आपल्या कल्पनाशक्तीतून शहरातील विविध इमारतींच्या कुंपण भिंतींना चित्रकारांनी अधिक सुशोभित करून दाखविले आहे. मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील इमारतीच्या भिंतींवर […]

नागपूर :- विदर्भ अर्बन बँकस को-ऑपरेटीव्ह असोसिएशन नागपूरच्या पंचवार्षिक निवडणुका अविरोध झाल्या व या असोसिएशनच्या पदाधिका-यांची सुध्दा अविरोध निवडणुक झाली यामध्ये खालील पदाधिकारी निवडुण आले. अध्यक्ष रविंद्र दुरुगकर, उपाध्यक्ष सतिश गुप्ता, सचिव  तुषारकांती डबले, सहसचिव सुभाष देवळकर वरील निवडणुक  सुनिल सिंगतकर जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सर्व निर्वाचित पदाधिकारी व संचलकांचे संजय भेंडे, अध्यक्ष नागपूर जागतीक बँक, कैलाशचंद्र, रामेश्वर फुंडकर […]

– अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी बडदास्त – 160 खोल्यांच्या गाळ्यांत सुविधा – अद्ययावत टेक्नॉलॉजीतून हीट पंप नागपूर :- अधिवेशनासाठी येणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना चोवीस तास गरम पाणी मिळावे. त्यांचा वेळ वाचावा आणि संभाव्य धोका टळावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने गरम पाण्यासाठी हिट पंप बसविला आहे. दीड कोटी रुपयांचा खर्च करून ही कायमस्वरूपी सुविधा 160 खोल्यांच्या गाळ्यात करण्यात आली. शिवाय प्रत्येक क्वॉर्टरमध्ये फोमच्या गाद्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com