नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या वतीने ‘पौर्णिमा दिवस’ अभियानाद्वारे मंगळवारी (ता.१७) देव नगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, पिनाकी बानीक आदींनी जनजागृती केली. स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी मनपाच्या विद्युत […]
Marathi News
नागपूर :- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा कामकाजासाठी सदस्य चैनसुख संचेती यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.
नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे […]
नागपूर :- मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवास येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख तथा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी मंत्री लोढा यांचे स्वागत केले. राज्यातील रोजगार निर्मिती क्षेत्र, पायाभूत सुविधा, केंद्र व राज्य शासनाकडून विकासासाठी होत असलेले प्रयत्न आदी विविध बाबींची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी […]
– ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन ! नागपूर :- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा सपशेल पराभव करून ऐतिहासिक विजय संपादन करणाऱ्या हिंदु धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा संत-महंत, समस्त मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत १९ डिसेंबरला नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित […]
Ø नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान Ø आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त नागपूर :- माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत […]
नागपूर :- शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजी एंटरप्रायझेस व बीव्हीजी इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर अनियमितता व मनमानीची प्रकरणे समोर येत आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत या कंपन्यांना शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, या व्यवस्थेमुळे शहराच्या स्वच्छतेच्या स्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा झाली नाही. कचरा संकलन करणाऱ्या गाड्या दररोज घरोघरी पोहोचत नाहीत. काही भागांमध्ये […]
गडचिरोली :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली द्वारा आयोजित क्रीडा सप्ताह 2024-25 क्रीडा संस्कृतीची जोपासना खेळाडू व विद्यार्थ्यामध्ये व्हावी तसेच क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्या अनुषंगाने दि. 12 डिसेंबर 2024 रोजी […]
नागपूर :- मनपा जेष्ठ नागरिक कक्षात पुज्य साने गुरूजी यांची 125 वी जयंती सिनियर सिटीझन कौन्सील ऑफ नागपूर डिस्ट्रीक्ट व्दारे साजरी करण्यात येत असुन मुख्य अति म्हणून आंचल गोयल, अति आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त मनपा व डॉ. रंजना लाडे उपायुक्त पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोहर खर्चे राहतील असे मनपा ज्येठ नागरिक कक्ष व संस्थेचे सचिव सुरेश […]
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (17) रोजी शोध पथकाने 59 प्रकरणांची नोंद करून 44,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]
– तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन – डोंगरगाव येथे क्रीडासंकुल उभारण्यात येणार काटोल :- विद्यार्थ्यांमध्ये शिस्त असायला हवी तेव्हाच तो यशोशिखर गाठू शकेल. पुस्तकी ज्ञानाबरोबरच मैदानी खेळातही तो पारंगत असायला हवा. जिल्हा परिषदेच्या शाळेत बऱ्याच ठिकाणी मैदान नाही म्हणून विद्यार्थ्यांच्या सरावासाठी लवकरच डोंगरगाव येथे २५ एकर परिसरात ७५ कोटी रुपयाचे क्रीडा संकुल उभारण्यात येईल. शिक्षकांनी आधुनिक युगात नवीन तंत्रज्ञान […]
गडचिरोली :- विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे ग्रामीण क्षेत्रासाठी सबंधित ग्रामपंचायत अंतर्गत ठराव घेवुन घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचे मार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास यादीसह प्रस्ताव सादर करावे. विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे […]
ज्यांचा राज्यातल्या राजकारणाशी सत्तेशी सततचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दरक्षणी संबंध येतो त्यांना आता तातडीने स्वतःमधे काही बदल करवून घ्यावे लागतील अन्यथा महाराष्ट्र हे राष्ट्रातले जगातले सर्वाधिक भ्रष्ट राज्य प्रांत म्हणून ओळखल्या जाईल एवढा धुडगूस सत्तेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित ज्याने त्याने घातला आहे मात्र त्याचवेळी एकमेव आशेचा किरण राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी हा सत्तेतलाधुडगूस भ्रष्टाचार बेधुंद कारभार खपवून न […]
– ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा मुंबई :- महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा […]
नवी मुंबई :- केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 या कालावधीत ‘देश का प्रकृती प्ररीक्षण’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत असलेली महाविद्यालये आणि रुग्णालयातील वैद्य, स्वयंसेवक आपल्याकडे येऊन संबंधित प्रकृती परीक्षण करतील अशी माहिती पोदार वैद्यक महाविद्यालया (आयु)चे अधिष्ठाता यांनी दिली आहे. देशभरातील संपूर्ण जनतेचे प्रकृती परीक्षण करुन प्रकृतीनुसार आहार […]
नागपूर :- थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदराजवळील आमझरी आणि भीमकुंड येथे साहसी खेळाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. जायंट स्वींग, झिप लाईनसह 400 मीटरवरील स्काय सायकलींग क्रीडा प्रकाराने युवा पर्यटकांना भूरळ घातली आहे. याठिकाणी असलेल्या उत्तम सुविधांमुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. चिखलदरापासून 5 किलोमीटर अंतरावर आमझरी मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अडीचशे लोकसंख्या असलेल्या गावाने मध […]
– मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पोहरादेवी, धामगणव देव येथे भेट व दर्शन यवतमाळ :- जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद हेच आपले बलस्थान आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून देत जनतेने विश्वास टाकला. त्यांच्या आशीर्वादानेच चौथ्यांदा मंत्री म्हणून राज्याच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाली, असे प्रतिपदान नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी केले. महायुती सरकारमधील नवनियुक्त मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी […]
– अवॉर्ड लेटर मिळाले पैसे मिळाले नाही – रक्कम जमा करण्याचे सचिवाचे आश्वासन नागपूर :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) च्या वतीने अनुसूचित जातीच्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फेलोशिप मागील अडीच वर्षापासून मिळाली नाही. विद्यार्थ्यांनी दोन वर्ष आंदोलन केल्यावर 10 सप्टेंबर 2024 रोजी मंजूर करण्यात आली. 22 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना अवार्ड लेटर देण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी […]
नागपूर :- रविवारी नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र शासनचे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्यामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहेत.ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे हा ओबीसी समाजाचा अपमान आहे. युती सरकारने त्यांचा ओबीसी मतांसाठी वापर करून […]
नागपूर :- प्रहार मिलिटरी शाळेत, रवी नगर येथे 16 डिसेंबर रोजी विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 1971च्या भारत-पाक युद्धातील ऐतिहासिक विजयानिमित्त, हा दिवस शौर्य आणि देशभक्तीच्या भावनेने प्रेरित करत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या विशेष कार्यक्रमात यंदा विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल महेश प्रभाकर देशपांडे (निवृत्त),सुभेदार मेजर हेमराज खापरीकर,ग्रुप […]