मुंबई, दि. 24 (रानिआ): विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 […]

गडचिरोली, दि.24, जिमाका : गडचिरोली जिल्ह्यात कोविड लसीकरणाला गती देण्याचे व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. जिल्हयातील 11.88 लक्ष लोकसंख्येपैकी 8.35 लक्ष पात्र नागरिकांना कोरोना लसीकरणाचे उद्दिरष्ट ठेवण्यात आले आहे. पैकी लशीचा पहिला डोस 6,14,141 नागरिकांनी घेतला आहे त्याची टक्केवारी 73.55 आहे. तर दुसरा डोस 2,86,022 म्हणजेच 34.25 टक्के लोकांनी घेतला आहे. यामध्ये पहिला डोस […]

नागपुर  – मी मनोज मोतीराम डोर्लीकर वय ३४ वर्षे रा. प्लॉट नं. १२६ , मोतीलाल नगर, दिघोरी, नागपूर येथील कायमस्वरुपी राहतो व आपणास नम्र निवेदन सादर करतो की, मी दि.२७/४/२०१९ रोजी जगदीश देवीदास जांगडे राह. प्लॉट नं. ६०, दत्त मंदीर रोड, वार्ड नं.२, चनकापूर पो. खापरखेडा, त. सावनेर जि. नागपूर व ओम यशवंत नागपूरे कळमना, नागपूर यांचे पासून त्यांचा नावाने […]

  राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली मागणी परिवारातील एका शासकीय नोकरी व घरकुल देण्याची केली मागणी स्थाई व्यवस्था होईपर्यंत नक्षलग्रस्त व नक्षल पिडीतांची अतिक्रमित घरे व दुकाने न हटविण्याची केली विनंती गडचिरोली– आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासन निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून जीवन जगण्याची संधी देत आहे .परंतु नक्षलपासून पीडीत व ग्रस्त असणाऱ्या लोकांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या […]

अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची, व चामोर्शीचा समावेश गडचिरोली,(जिमाका)दि.24*: विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची, व चामोर्शी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित ना.मा.प्र. व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतीम आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात […]

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इस्माईलपुरा रहिवासी व एका गॅरेज मध्ये मेकॅनिकल म्हणून कार्यरत  मोलमजुरी करणाऱ्या एका इसमाने  अज्ञात कारणावरून राहत्या घरातील लाकडी   फाट्याला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गतरात्री 8 दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव मो मोहीन मो शब्बीर वय 47 वर्षे रा इस्माईलपुरा कामठी असे आहे.     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाच्या […]

भंडारा : राज्य निवडणूक आयोग दिनांक 23 नोव्हेंबर 2021 चे सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद भंडारा निवडणूक विभागामधील नागरिकांचा मागासवर्गामधील महिला तसेच सर्वसाधारण महिलांकरीता पुन्हा सोडत पध्दतीने आरक्षणाची कार्यवाही करण्याकरीता 25 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची/ नागरिकांची सदर विशेष […]

नागपूर – संपूर्ण नागपूर शहरातील नागरिकांना तसेच भारतातील सर्व भारतीयांसाठी व नागपूर शहरातील चौकाचौकात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सकाळी ठीक ९ वाजता 5 मिनिट संविधानाचे प्रास्ताविक वाचन करणार असल्याची माहिती दिली इंडियन आंबेडकर राईट वूमन्स फोरम तर्फे अध्यक्षा सुषमा कळमकर, नीता बागडे, सोनिया गजभिये, रेखा लोखंडे,ममता गणवीर, प्रीतीबाला बोरकर, सुजाता भोंगाडे, दिनूबाला भगत, रजनी तायडे, प्रज्ञा मेश्राम, रोशनी गंभीर […]

कोरोना पॉझिटिव्ह00 एकूण डिस्चार्ज58971 एकूण पॉझिटिव्ह60105 क्रियाशील रुग्ण01 आज मृत्यूशून्य एकूण मृत्यू1133 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट375 एकूण टेस्ट473781 भंडारा : जिल्ह्यात मंगळवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.23) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 02 आहे. मंगळवारी 375 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. जिल्ह्यात आता एक सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58971 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60105 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 73 हजार 781 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60105 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये […]

नागपूर : नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या इंक-एन-पेन पब्लिकेशनच्या ‘अनलॉक-२०२१’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते व मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत उद्गीर येथे मंगळवारी (ता. २३) करण्यात आले. उदगीर येथे पुढील वर्षी साहित्य संमेलन आयोजित करण्याबाबत जागेची पाहणी आणि उदगीर शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह राज्यभरातील साहित्य महामंडळाचे सदस्य बैठकीला […]

रामटेक –    होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच    ग्रीन लैंड येथे भारतीय जनता पार्टी विधानपरिषदे चे उमेदवार माजी मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे  यांनी   बैठक घेतली  . रामटेक विधानसभेतील 3 ही नगर परिषेदे चे अध्यक्ष,उपाध्यक्ष नगरसेवक,नगरसेवकांची बैठक घेतली यावेळी रामटेक,कन्हान, पारशिवनी येथील संपूर्ण नगरसेवक उपस्थित होते यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी ,  भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये,  नगराध्यक्ष दिलीप […]

नागपूर  : संवैधानिक न्याय, हक्क व अधिकाराच्या मागणीसाठी गोवारी समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चावर करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या गोवारी बांधवांना मंगळवारी (२३ नोव्हेंबर) शहीद दिनी भाजपाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आदरांजली अर्पण केली. झिरो माईल येथील शहीर गोवारी स्मारकस्थळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास राऊत, मारोतराव काळसर्पे, सुरेश दुधकावरे, जयदेव राऊत, शैलेश बोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. गोवारी समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता पात्र नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २७ नोव्हेंबर व २८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणी व मतदार यादीतील दुरुस्ती, तपासणी संदर्भात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला बजावता यावा यासाठी मतदार नोंदणी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे […]

नागपूर : नागपूर शहरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामधील मेट्रो स्टेशनला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. मात्र या स्टेशनवर केवळ ‘आंबेडकर चौक’ असा उल्लेख असलेला फलक असून तो फलक तात्काळरित्या बदलवून येथे ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे सुधारित नामफलक लावण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक […]

नागपुर – 23 नोव्हेंबर 1994 ला (28 वर्षापूर्वी) गोंड गोवारी या जमातीमध्ये एक कॉमा टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या गोवारी समाजाच्या मोर्चाने शरद पवार सरकार मध्ये 114  जीव गमावले. परंतु 28 वर्षांनंतरही भाजप-सेना व कॉंग्रेस-राकाच्या सरकारने त्यांना न्याय दिला नाही. त्या अन्यायकारी व संविधान विरोधी सरकारच्या निषेधार्थ व शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज बसपाने शहीद गोवारी स्मारकास अभिवादन करुन या दोन्ही सरकारचा निषेध करुन […]

कामठी – राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषद २५ नोव्हेंबरला आभासी पद्धतीने संविधांनदिन साजरा करणार आहे. मागील वर्षी  संविधान दिनी प्रा हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.राज्यशास्त्र शिक्षक परिषद प्रत्येक वर्षी राष्ट्रीय व सामाजिक  कार्यक्रमाचे आयोजन करत […]

गडचिरोली – आमदार डॉ देवरावजी होळी यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी सन २०१४ पासून थकीत असलेला दरमहा रुपये ४ हजार प्रमाणे कमांडो भत्ता देण्याची केली मागणी C-60 कर्मचाऱ्यांप्रमाणेच विशेष कृती दलातील जवानांनाही करावे लागतात जोखमीची कामे नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या कृत्यास आळा घालण्यासाठी सी-६० व विशेष कृती दल कार्यरत आहेत.मात्र सी-६० जवानांना ज्याप्रमाणे ४ हजार कमांडो भत्ता देण्यात येतो […]

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त मार्गदर्शन कार्यशाळा स्वयम् संस्था व माय करिअरचे आयोजन नागपूर : कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप समजून घ्यावे. प्रत्येक अभ्यासघटकाला समान महत्त्व देऊन त्यानुसार तयारी केली तर गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे शक्य होते, असा मूलमंत्र सहायक पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील हाडगे यांनी युवक-युवतींना दिला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअर […]

नागपूर– उत्तर नागपूरला जोडणारा कामठी महामार्ग पुढील तीन महिण्यासाठी बंद करण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून संपूर्ण वाहतूक मंगळवारी बाजार पुलावरून वळविण्यात आल्याने पुलावर तासभर वाहतूक ठप्प होती. वाहतूक पूर्णत विस्कळीत झाल्याने कार्यालयात जाणाèयांना उशिर झाला.  वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहनांच्या गर्दीत अनेकांचे वाहन फसले. विशेष म्हणजे प्रचंड गर्दी होवूनही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे […]

रुग्ण डिस्चार्ज00 एकूण डिस्चार्ज58969 एकूण पॉझिटिव्ह60105 क्रियाशील रुग्ण03 आज मृत्यूशून्य एकूण मृत्यू1133 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट13 एकूण टेस्ट473406 भंडारा, दि. 22 : जिल्ह्यात सोमवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.22) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. सोमवारी 13 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता तीन सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58969 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60105 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 73 हजार 406 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60105 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com