मुंबई : पोलिस दलास कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्डची मोठ्या प्रमाणावर मदत होते. राज्यात कार्यरत  होमगार्डना नियमित स्वरूपात 180 दिवस काम देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. होमगार्ड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत होमगार्डसाठी असलेले अनुदान, कर्तव्य भत्ता अदा करण्यासाठी नियमित निधी […]

‘माझी वसुंधरा अभ्यासक्रम’ शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द मुंबई – : शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला असून शालेय शिक्षण विभाग त्याची कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी निश्चित पूर्ण करेल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्याच्या पर्यावरण […]

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने, येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजु आदिवासी नागरिकांना मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या संकल्पनेतून व मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख […]

 पुणे –  विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि नव्या पिढीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय  विद्यापीठाच्या 18 व्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलपती डॉ.एस.बी. मुजुमदार, मुख्य संचालिका आणि  प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर,  कुलगुरू […]

एनसीपी अ‍ॅपचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन… विद्यार्थी संघटनेच्या ‘महाराष्ट्र युथ कार्निव्हल’ लोगोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण… मुंबई  – शाहू – फुले – आंबेडकर यांची दूरदृष्टी समाजाला पुढे नेण्याची होती त्यांच्या या दुरदृष्टीच्या सुत्रावरच आमचा राष्ट्रवादी पक्ष काम करतोय असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आज नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय […]

भारतीय शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजन नाही तर आत्मानुभूती  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भारतीय शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजन किंवा करमणुकीचे साधन नसून ती आत्मानुभूती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. श्री षण्मुखानंद ललित कला व संगीत सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात शनिवार (दि. ११) राज्यपालांच्या हस्ते शास्त्रीय संगीत क्षेत्रातील देशभरातील ५० युवा कलाकारांना श्री षण्मुखानंद एम एस सुब्बलक्ष्मी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या, त्यावेळी राज्यपाल […]

 पर्यावरण पूरक आणि निरोगी समाजासाठी सायकलिंग आवश्यक!- डॉ.अमित समर्थ!  जवाहरलाल नेहरू अँल्युमिनियम संशोधन केंद्रातर्फे आयोजित!  वाडी (प्र.) :केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाडी येथील जवाहरलाल नेहरू अँल्युमिनियम रिसर्च सेंटर तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत वाडी ते कोंढाळी ही ७५ किमी अंतराची सद्भावना सायकल मॅरेथॉन रविवारी पार पडली.सकाळी ६ वाजता जेएनएआरडीडी चे प्रमुख निर्देशक डॉ.अनुपम अग्निहोत्री, विविध पुरस्कारांनी सन्मानित आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ.अमित […]

नागपूर – आलेल्या एका रुग्णाचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल सकारात्मक आढळून आला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. ५ डिसेंबर रोजी नागपूरात आलेल्या  प्रवाशांच्या आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णाची रिपोर्ट जिनोम सिक्वेंसिंग साठी पुणे एन आई वी मध्ये पाठविण्यात आला होता. त्या अहवालातील एका रुग्णाला ओमायक्रॉन असल्याचे आढळून आले. आयुक्तांनी सांगितले […]

रूपये दोन कोटी (२,१२,६६,९५०/-) वसुली गडचिरोली  – गडचिरोली जिल्हयातील न्यायालयात दिनांक ११ डिसेंबर, २०२१ रोजी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी मामले तसेच इतर मामल्याकरीता राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातुन ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी ८९ प्रलंबित आणि ४१४ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढले आणि रूपये दोन कोटी (२,१२,६६,९५०/- ) वसुली करण्यात आली. किरकोळ स्वरूपाच्या मामल्यांकरीता स्पेशल ड्रायव्हद्वारे एकुण २६ प्रकरणे निकाली काढण्यात […]

२८ लाख २५ हजाराची तडजोड करून प्रकरणांचा केला निपटारा. रामटेक :- रामटेक तालुका विधी सेवा समिती व बार संघ रामटेक यांच्या वतीने , दिवाणी न्यायालय रामटेक येथे राष्ट्रीय अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनेल समोर दिवाणी व फौजदारी (१३८) एन.आय. ॲक्ट. ,बँक पतसंस्थांचे दाखल पूर्व प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीचे घर व पाणी करांची प्रकरणे ठेवण्यात आली. त्या पैकी ३  दिवाणी व ७ फौजदारी प्रकरणे ४५ […]

नागपूर  – सन 1953 मध्ये माध्यप्रदेशचे तत्कालीन महसूलमंत्री तथा महाराष्ट्रचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पदंश्री रामसिंगजी, प्रतापसिंग आडे ,बाबूसिंग राठोड , मुडे गुरुजी , गजाधर राठोड ,हिरा सदा पवार , सोनबा चंदू नाईक, आदी लोकांना सोबत घेऊन यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या नावाने सामाजिक संघटनेची स्थापना केली. सन 30 जानेवारी 1953 ला यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे ऑल […]

मनपा आयुक्तांनी दिले निर्देश; नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन   नागपूर  : नागपूर महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करणाऱ्या गाडीत ओला आणि सुका कचऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही नागरिक घरातील कचऱ्याचे विलगिकरण न करताच स्वच्छता दूताकडे देतात. त्यामुळे मनपाद्वारे ओला आणि सुका कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. १५ डिसेंबर पासून विलगीकृत नसलेला […]

-स्वनिर्मित खतातून केले किचन गार्डन विकसित : मनपातर्फे घरी जैविक/गांडूळ खत निर्मितीस प्रोत्साहन   नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे कचऱ्यापासून जैविक/गांडूळखत निर्मिती करून किचन गार्डन विकसित करण्यावर भर दिला जात आहे. शनिवारी धंतोली झोन अंतर्गत अरविंद सोसायटी, नरेंद्र नगर येथील रहिवासी श्री अजित कुलकर्णी आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री जाधव यांनी ओल्या कचऱ्यापासून जैविक/गांडूळखत निर्मिती करून किचन गार्डन विकसित केले आहे. धंतोली झोनच्यावतीने […]

नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतील मनपा शाळेतील ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. फुले मार्केट येथील नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेत सुरू असलेल्या ‘सुपर-७५’ वर्गांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी (ता. ११) भेट दिली. भेटीदरम्यान महापौरांनी विद्यार्थ्यांशी तसेच त्यांच्या पालकांशी चर्चा केली.   यावेळी मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर, असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे सचिव जयंत गणवीर, मनीष […]

–  एकाच दिवशी 1 हजार 941 प्रकरणे निकाली भंडारा : संसार म्हणजे दोन अनोळखी माणसांनी आयुष्यभर सोबत करावयाचा प्रवास. या प्रवासात कधी सुख येतं तर कधी दुःख भर घालत असत. मात्र तरी देखील एकमेकांना सोबत करायची…! कधी कधी या संसारात छोट्या गोष्टीवरून खटके उडतात. दुरावा निर्माण होतो. मात्र आजच्या लोक अदालत आयोजनाची यशस्वी फलश्रुती भंडारा येथे पहावयास मिळाली. दुरावा आलेल्या जोडप्याने […]

रामटेक : रामधाम -खिंडशी  परिवारातील सदस्य बारकू श्रावण बांगडे यांचे आपत्कालीन अपघातात निधन झाले असल्याने त्यांचा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला अश्यातच  रामधाम  खिंडशी परिवाराचे संस्थापक  चंद्रपाल चौकसे तसेच संध्या चंद्रपाल चौकसे  यांचा कडून बारकू बांगडे  यांचा परिवाराला आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.  यावेळी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे , संध्या चंद्रपाल चौकसे , व खिंडशी येथील कर्मचारी उपस्थित  होते.कोरोना काळातही जेव्हा संपूर्ण  देश […]

मुंबई – उत्तराखंडचे सुपुत्र असलेले जनरल बिपीन रावत हे द्रष्टे सरसेनापती होते. भारतीय सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाचे त्यांनी सुरु केलेले कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. तिन्ही सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवारी राजभवन येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी […]

डॉ. सुधीर भोंगळे यांनी तयार केलेल्या ग्रंथाचे मान्यवरांकडून कौतुक… मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या काही निवडक भाषणांचे संकलन केलेले ‘नेमकचि बोलणें’ या ग्रंथाचे प्रकाशन आज वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये उत्साहात पार पडले. आदरणीय पवारसाहेबांनी १९८८ ते १९९६ या काळात […]

ईडी कधी घरावर छापा टाकतेय याची पुष्पगुच्छ घेऊन वाट बघतोय.. किरीट सोमय्या यांना ईडीने अधिकृत प्रवक्ता म्हणून नियुक्तीपत्र द्यावे… मुंबई  – काही दिवसापासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे अशा बातम्या पेरण्यात येत आहेत. त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग बंद करावा. काही असेल तर रितसर प्रेस नोट काढा आणि त्या बातम्यांची जबाबदारी स्वीकारा.भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम […]

नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेतर्फे २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर चंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. २१ नोव्हेंबर ते सात डिसेंबरपर्यंत घेण्यात आलेल्या शिबिरात ५ हजार ४५८ नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरात २ हजार ३७२ व्यक्तींनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतली. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com