नागपूर २८ : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अ‍ॅक्वा आणि ऑरेंज लाईनवरील २४ मेट्रो स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू झालेली आहे. जागतिक दर्जाच्या, सोयीस्कर मेट्रो वाहतूक व्यवस्थेकडे नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. आता लवकरच रिच-२ म्हणजे सीताबर्डी इंटरचेन्ज ते ऑटोमोटिव्ह चौक या मार्गिकेवरील मेट्रो सेवा देखील सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील स्थानकांचे कार्य वेगाने […]

-नागपुर मध्ये चंदीगड महानगरपालिका निवडणुक विजया चा जल्लोष आपने 35 पैकी 14 जागा जिंकल्या, चंदीगड महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला नागपुर – आम आदमी पार्टीने, चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अभूतपूर्व निवडणूक पदार्पण करताना, विजयी झाला – 35 पैकी 14 जागा जिंकल्या आणि चंदीगड महानगरपालिकेतील सर्वात मोठा पक्ष बनला. आम आदमीच्या भल्यासाठी काम करण्याच्या पक्षाच्या इच्छेमुळे, समर्पक नागरी समस्यांकडे लक्ष […]

नागपूर – उपराजधानी नागपूर जिल्हा इंटक द्वारे कामगारां संबंधीच्या समस्या बाबतचे निवेदन माननीय आमदार तथा अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी श्री विकास ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून सादर केले आहे या प्रसंगी नागपूर जिल्हा तील एस टी महा मंडळ, मेट्रो, स्टार बस, मिहान, एमआयडीसी, पोस्टल, बँक, महानगरपालिका कचरा उचलणाऱ्या गाड्यावर कामगार आणि इतरही क्षेत्रात कामगारांनी न्याय मिळवून देण्यास त्यांच्या कामगार संघटना चळवळीस […]

-मनापासोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहभाग   चंद्रपूर : नायलॉन मांजाला पूर्णतः हद्दपार करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पावले उचलली असून, नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी झोननिहाय ३ पथक गठीत करण्यात आले आहे. यात मनापासोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहभाग राहणार आहे. नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर […]

 सावनेर :- अंतर्गत 12 कि.मी. अंतरावरील पाटणसावंगी खापा टी पॉईंट सावनेर येथे दिनांक 26/12/2021 चे 16.50 वा. ते 17.50 वा. दरम्यान सावनेर पोलीस पथक पेट्रोलिंग  करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन सावनेर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन एम. एच. -40/एन-2420 क्रमांकाच्या […]

-ओमिक्रॉनपासून सुरक्षेसंदर्भात व्यवस्थेचा घेतला आढावा : चाचणी न करणा-यांवर साथ रोग प्रतिबंधक नियमांतर्गत कारवाई होणार नागपूर  : देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ नये यासाठी कठोर पावले उचलली आहेत. विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणा-या नागरिकांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे, यासंबंधी स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.             कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या […]

-३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. २७ डिसेंबर)  रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई करीत  १०० प्लास्टिक पतंग जप्त केली. या कारवाईत ५,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध  पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनमधील ७ पतंग दुकानांची तपासणी करुन १०० प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले. शोध पथकाने १० झोन मध्ये ५२ दुकानांची तपासणी केली.             याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन क्र. 2 मध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या व स्वच्छता अभियानात विशेष सेवा देणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचा सत्कार करण्यात आला. झोन कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात महापालिका अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, प्रभारी सहायक आयुक्त श्री नरेंद्र बोबाटे, स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने स्वच्छ […]

-संबंधित नागरिकांना  तक्रारींसह उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही  दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजताच्या दरम्यान  मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये   लोकशाही  दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.          संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात […]

नागपूर : भारतीय क्रीडा प्राधिकरण (स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया) अर्थात ‘साई’च्या कामाचा सोमवारी (ता.२७) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेतला. ‘साई’च्या मुंबई क्षेत्र संचालक (रिजनल डायरेक्टर) सुष्मिता ज्योतसी यांनी सोमवारी नागपूरातील ‘साई’ केंद्राची पाहणी केली व यानंतर यासंबंधी मनपा मुख्यालयात महापौर दयाशंकर तिवारी यांच्याशी चर्चा करून माहिती दिली. यावेळी ‘साई’चे अभियंता दीनकर कुमार, केंद्राच्या कार्याचे समन्वयक आशिष बॅनर्जी उपस्थित होते.             नागपूर शहरामध्ये उदयोन्मुख खेळाडू आणि क्रीडा प्रशिक्षकांना मोठे […]

नागपूर:  शिक्षणमहर्षि आणि देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंती ‍निमित्त मनपा मुख्यालयातील मा.महापौर कक्षा समोरील दालनात मा.आयुक्त राधाकृष्णन बी व नगरसेवक विरेन्द्र (विक्की) कुकरेजा यांनी त्यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

-सिल्लेवाडा परिसरातील घटना -पोलीस गस्त वाढविण्याची मागणी सिल्लेवाडा– सिल्लेवाडा वेकोली परिसरात अज्ञात समाजसंकटांचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे अलीकडे त्यांनी शाळा महाविद्यालयाना टार्गेट करने सुरू केले असून सिल्लेवाडा वेकोली परिसरात असलेल्या एका तोडफोड केली असल्याचे निदर्शनास आले आहे यासंदर्भात खापरखेडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली असून समाजसंकटावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात […]

 मुंबई, दि.२६ :  कासा कोरोलीना, बिल्डींग फ्लॉट नं.१, तळ मजला, मोरी रोड, सोनावाला फायर टेम्पल समोर, माहिम मुंबई येथे छापा घातला असता या ठिकाणी परदेशातून आयात झालेल्या विविध मद्याच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व परराज्यातील मद्य अशा एकूण विविध क्षमतेच्या १२३ सिलबंद बाटल्या व १८ रिकाम्या बाटल्या असा एकूण ८ लाख ३७ हजार ६९२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये झहीर होसी मिस्त्री यास महाराष्ट्र दारुबंदी […]

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का): जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती सरकार म्हणून आम्ही करू. विकासासाठी काम करताना त्यामध्ये कोणतेही राजकारण न आणता एकोप्याने काम करा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.             जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात नियोजन समितीचे कामकाज, कोविड – 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजना तसेच चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याविषयी आढावा बैठकीचे आयोजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले […]

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. २८, बुधवार दि. २९ आणि गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ […]

-पर्यटनाचे दुसरे नाव म्हणजे चंद्रपाल चौकसे    -पर्यटनाची ओळखं ही चंद्रपाल चौकसे यांनी निर्माण केली  – नामदार सुनील केदार यांचे गौरवउदगार रामटेक :- पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी निर्मिती केलेला संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले रामधाम तीर्थ क्षेत्र व लाईट हाऊस वॉटर पार्क मनसर येथे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असलेलं सर्वात मोठा ओम, वैष्णव देवीचे मंदिर, बर्फानी बाबा अमरनाथ यांचे […]

-अखिल भारतीय कवी संमेलनात चढला देश भक्तीचा : देशातील नामवंत कवींना नागपूरकरांनी दिली भरभरून दाद नागपूर, ता. २६ :  ‘देश दीपक पर जले ऐसा पतंगा चाहिए एकता, सद्भावना की धार गंगा चाहिए तन पे लाखों रंग से खेलिए होली मगर मन में केवल तीन रंगो का तिरंगा चाहिए…’      देशभक्ती जागविणाऱ्या या ओळींसह कमल आग्नेय यांनी अखिल भारतीय कवी संमेलनाची रंगतदार […]

नागपूर: २६ डिसेंबर – आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर यांचे दुसरे अधिवेशन नागपुरात पार पडले. या अधिवेशनाच्या निमित्ताने कॉ.आनंदी अवघडे अध्यक्षा महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन यांनी आशा व गटप्रवर्तक यात गेले. १० वर्ष केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान या अभियानात काम करत आहेत केंद्र सरकारने त्यांना कमीत कमी मोबदला व जास्तीत जास्त काम करून घेण्याचे धोरण अवलंबिले आहे .सी […]

नागपूर – ढिवर व तत्सम समाजातील विद्यार्थ्यांचा, समाज कार्यकर्त्यांचा, लोकप्रतिनिधींचा सत्कार आणि उपवर वधू-वर परिचय मेळावा कार्यक्रमात गुरुदेव सेवा आश्रम शुक्रवारी तलावाजवळ, आग्याराम देवी चौक, नागपूर येथे नुकताच मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी मा.सदशिवराव वलथरे आणि उट्घाटक अँड. नीरज खांदेवाले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अरुण लाटकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ढिवर महिला समाज संघटनेच्या अध्यक्षा सौ.वनिता मनोज […]

-फिडर सर्विस करिता करीत आहे उपयोग -मेट्रो स्थानकावरील सायकल ला नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती नागपूर २६  – महा मेट्रोने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत अनेक उपाय योजना केल्या असून ज्यामध्ये मेट्रो स्थानकांवर ई- बाईक, ई – रिक्षा, इलेक्ट्रिक वाहनांन करिता चार्जिंग पॉईंट,फिडर बसची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवरील प्रत्येक मेट्रो स्थानकांवर प्रवाश्यानकरिता सायकल ठेवण्यात आल्या असून […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com