नागपूर, ०१ जनवरी : महा मेट्रो नागपूर अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि सीताबर्डी इंटरचेंज से लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान २६.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होत आहे आणि लौकरच १३.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होणार आहे. यात सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.५ किमी आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक […]

   पुणे, दि.१:  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले.             यावेळी ऊर्जामंत्री डॉ.  नितीन राऊत म्हणाले, कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ ऐतिहासिक आहे. या ठिकाणी शौर्य गाजविणाऱ्या शूरवीरांना अभिवादन करताना  विशेष आनंद होत आहे. राज्य शासनाने या स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून आवश्यक त्या सोयीसुविधा लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हा  स्तंभ शौर्याचे प्रतीक असल्यामुळे […]

  पुणे, दि.१:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा येथील इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे असे ते यावेळी म्हणाले.             यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.             राज्यातील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्राला […]

चंद्रपूर, ता. १ : शहरातील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सोमवार, दि. ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी आणि पालकांमधील गैरसमज दूर व्हावे, यासाठी शहरातील डॉक्टरांनी जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीसाठी जनजागृती केली. ही लसीकरण मोहीम शहरातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये  राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व शासकीय […]

 – ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषण –  निर्णय तत्काळ अंमलात आणा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना मुंबई दि 1: नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरातील शाळा आणि अंगणवाडीतील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही लसीकरण मोहीम शहरातील १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार असून, एकूण ७६ हजार २५ मुलांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी दिली.   जपानीज एन्सेफलिटीस आजाराचा […]

-ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या प्रश्नावर महापौर दयाशंकर तिवारी यांचे सभागृहात निर्देश नागपूर. प्रभाग २३ येथील अंतुजी नगर व न्यू सुरज नगर या भागांना झोपडपट्टी घोषित करण्यासंदर्भात येणारे अडथळे लक्षात घेता मनपा आयुक्तांनी स्वत: परिसरात भेट देउन पाहणी करावी व त्यानंतर आवश्यक तो निर्णय घ्यावा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये दिले. प्रभाग २३ येथील अंतुजी नगर व न्यू […]

नागपूर – नागपूर महानगरपालिकेमध्ये गाजत असलेल्या स्टेशनरी घोटाळ्याच्या विषयावरून नगरसेवक व भाजपाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. ४१ बिलांवरून ६७ लक्ष रुपये संबंधित कंत्राटदारांना अदा करण्यात आल्याच्या प्रकरणामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्याद्वारे तक्रार नोंदविण्यात आली. या संपूर्ण प्रकरणातील कंत्राटदाराद्वारे वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांद्वारे मनपात कंत्राट मिळविल्याचे पुढे आले. ४० वर्षापासून एकाच परिवारातील सदस्यांनी वेगवेगळ्या पाच […]

नागपुर : दि.३१ डिसेंबर रोजी वर्षाअखेरिस झालेल्या मनपा च्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांनी नागपुर शहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत पशु वैद्यकीय सेवा कक्ष कार्यरत अधिकाऱ्याना वेठीस धरले.या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांनी नागपुर शहरात ठिकठिकाणी मोकाट जानवरे फिरत असतात यावर काय कार्यवाही करण्यात आली, या जनावरांमुळे जर अपघात झाला तर जबाबदार कोण,आजपर्यंत किती जनावरांच्या […]

-दोन डोस घ्या ; प्रतिबंधात्मक उपाय योजना पाळण्याचे आवाहन नागपूर : सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी नवीन वर्षाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहे. कोरोनाचे सावट अद्याप संपले नसून नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घ्यावेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.        आज मानकापूर जिल्हा क्रीडा संकुल येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील पाच जिल्हे कोरोना […]

-महापौर दयाशंकर तिवारी यांचा महत्वपूर्ण निर्णय : सर्वसाधारण सभेमध्ये दिले निर्देश नागपूर : नागपूर महानगरपालिकेमधील स्टेशनरी घोटाळ्याच्या संदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनपातील स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्याचे निर्देश त्यांनी शुक्रवारी (ता.३१) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये दिले विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आणि माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) […]

-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत निर्बंध घालण्याचा निर्णय  नागपूर  : वर्षाच्या शेवटी नागपूर जिल्ह्यामध्ये रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे आता कोविड निर्बंधासाठी पूर्वीप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रूपये, परवानगीपेक्षा अधिक गर्दी असणाऱ्या ठिकाणी आस्थापनांवर 10 हजार रुपये, मंगल कार्यालयात गर्दी दिसल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश जिल्हा […]

नागपुर – नागपुर ग्रामीण पोलीस दलातील ठाणेदारांच्या बदल्या झाल्या आहेत पोलीस अधिक्षक  विजयकुमार मगर यानी ७ पोलीस निरीक्षकांची , ४ सहायक पोलीस निरीक्षक आणि १ पोलीस उपनिरीक्षकांच्या अचनेपाने बदलांकडे सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे शुक्रवारी रात्री उशिरा बदल्याचे आदेश निघाले आहेत. बदली झालेले पोलीस निरीक्षक ( कंसात आधीचे व नियुक्तीचे ठिकाण) १) संतोष दाबेराव (पोलीस नियंत्रण कक्ष ते पोलीस स्टेशन […]

  मुंबई, दि. 31 :- राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ 20 लोकांना मुभा देण्यात आली आहे.             राज्य शासनाच्यावतीने जारी परिपत्रकात सदर माहिती देण्यात आली असून बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा 100 वरून 50 करण्यात […]

 मुंबई, दि. 31 :-  वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर उद्यापासून (1 जानेवारी 2022)  लागू होणारी 5 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांची जीएसटी वाढ रद्द करण्यात यावी तसेच केंद्राकडून राज्यांना मिळणारी जीएसटी नुकसानभरपाई 14 टक्के वार्षिक वाढीसह 30 जून 2022 नंतरही कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.              वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेची 46 वी […]

मुंबई, दि. 31 :- जबलपूर येथे झालेल्या 54 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत आतापर्यंतचे 23 वे विजेतेपद मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला संघाचे तसेच उपविजेत्या पुरुष संघाचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.  सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूला दिला जाणारा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जिंकलेली महाराष्ट्राची कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह सर्व सहकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले आहे. महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला असला तरी विजेत्या रेल्वेच्या संघात 12 पैकी 11 खेळाडू […]

     मुंबई, दि. 31 : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना श्री.देशमुख यांनी दिल्या आहेत.             वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत याबाबत […]

   मुंबई, दि. 31 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी २०२२ या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे २०२१ हे वर्ष देखील संपूर्ण जगाकरिता अत्यंत आव्हानात्मक असे होते. भारतातील लोकांनी शाश्वत मानवी मुल्ये, सर्व धर्मांची शिकवण व सेवाभाव यामुळे या आव्हानाला समर्थपणे तोंड दिले. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही, त्यामुळे यानंतर देखील सावधगिरी बाळगलीच पाहिजे. यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपल्याला […]

मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या डिसेंबर 2021 – जानेवारी 2022 चा ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार- दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या जोड अंकाचे प्रकाशन नुकतेच झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर हे अंकाचे मुख्य संपादक आहेत.             मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाली. […]

-डॉ. मंगेश गुलवाडे : जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीच्या जनजागृती पालकसभा चंद्रपूर, ता. ३१ : जपानीज एन्सेफलिटीस आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल होय. पालकांनी मनात कोणतीही शंका तीन जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत १ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करू घ्यावे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीच्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com