नागपूर – एल्केम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड व सह्याद्री संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरातील ज्या मुलांकडे घरी संगणक सराव करण्यासाठी सोय नाही अशा गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच नागपूर शहरातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना मनपा शाळेत प्रवेश घेण्यासाठी मदत करून मुख्य प्रवाहात ” विंग्स fly हाय ” या प्रकल्पाच्या अंतर्गत आणणार […]

 भारतीय मजदूर संघातर्फे असंघटीत कामगारांच्या मेळावा. नागपुर – देशभरात विविध क्षेत्रात काम करणारे 43 कोटींवर असंघटित कामगार आहेत. त्यांना कोणत्याही सोयी सुविधा किंवा सरकारी योजनांच्या लाभ मिळत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. केंद्र सरकारने या दुर्लक्षित कामगारांसाठी कायदे बनवून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असंघटित कामगार क्षेत्राचे प्रभारी (नवी दिल्ली) जयंतीलाल यांनी […]

  प्रशासनाचे खबरदारी आदेश जारी   प्रशासन 100 टक्के लसीकरणासाठी कटीबद्ध   लसीकरण एकमेव उपाय   त्रिसूत्रीचा अवलंब अनिवार्य नागपूर –  दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच  मास्कचा वापर, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. शासन लसीकरण व अन्य बाबींवर काटेकोर […]

मुंबई – स्पेनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जोस मारिया रिदाओ डॉमिन्गेझ यांनी सोमवारी (दि. २९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. स्पेन आणि भारतामध्ये व्यापारासह शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबद्दल आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांची संख्या ५०० दशलक्ष इतकी असून भारतात देखील स्पॅनिश भाषा शिकण्याकडे युवकांचा कल वाढत असल्याचे जोस मारिया यांनी सांगितले. […]

चंद्रपूर : शहर महानगरपालिकेद्वारे तुकूम तलाव भागातील शहरी प्राथमिक केंद्र क्र. ७ येथे दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी खास मुस्लीम समुदायासाठी लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. सादर शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सुरेश पचारे, नगरसेवक सोपान वायकर, नगरसेविका शीतल गुरनुले आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य तपासणीकरिता बालरोगतज्ञ डॉ. प्रफुल्ल भास्करवार, डॉ. अर्वा […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. २९ नोव्हेंबर) रोजी ०२ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]

नागपूर :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे.             लसीकरणसाठी ऑनलाईन आणि […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (२९ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ३३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४१९४८ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९३,३३,०००/- चा दंड वसूल केला आहे.           शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला […]

हृदय पिळवुन टाकणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना  कुही – इंदिराबाई हटवार ८० वर्षीय वृध्द महिला पाचगाव येथील रहीवासी आहे . या म्हातारीला कर्करोगासारखा गंभिर आजार झाला असुन अतिशय भयावह परिस्थितीमध्ये तीचा मुत्युशी संघर्ष सुरु आहे . तिने आपली संपत्ती मुलाच्या नावे केल्यानंतर मुलांनी तिला वाऱ्यावर सोडुन दिले . व तिची देखभाल करण्यास स्पष्ट नकार दिला . या म्हातारीची शारीरिक […]

चंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत मागील पाच महिन्यात पाच हजार 443 नवजात बालकांचा जन्म झाल्याचा अहवाल चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत सादर करण्यात आला. 29 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत महिला व बालकल्याण समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती पुष्पाताई उराडे व उपसभापती शितल कुलमेथे यांच्यासह समिती सदस्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या […]

कामठी – केंटोनमेंट में माल रोड स्थित अवंतिका स्कूल ऑफ होम साइंस में संविधान दिवस मनाया गया। इस दिन स्कूल के बच्चों को संविधान की शपथ दिलवाई गई। स्कूल के शिक्षकों ने बच्चों को डॉ. बाबासाहेब आंबेडकर के संबंध में जानकारी दी और बताया कि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ने 26 नवंबर को संविधान बनाया था जिसे 26 जनवरी को लागू किया गया। […]

लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याची देखील निर्देश ‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही  मुंबई – : कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या […]

नागपूर – : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत तपासणीत दिव्यांग (कानाने ऐकू न येणे) आढळलेल्या 16 मुलांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. राज्यस्तरीय सामंजस्य करारानुसार धंतोली येथील नेल्सन मदर अँड चाईल्ड केयर हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर शनिवारी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जावून शस्त्रक्रिया झालेल्या मुलांची व पालकांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रीय आरोग्य अभियान […]

नागपूर विभागाचा आढावा ‘ओमिक्रॉन’ विषाणू प्रतिबंधासाठी काळजी घेणे आवश्यक ऑक्सिजनची सज्जता ठेवण्यासह लसीकरणावर भर देण्याच्या सूचना नागपूर – : दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त श्रीमती […]

रामटेक –  पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर यांनी पोलीस स्टेशन चे वार्षिक निरीक्षण घेऊन पदोन्नती झालेल्या पोलीस हवालदार यांना सम्मानित केले . पोलीस स्टेशन पारशीवणी येथे नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.श्री विजयकुमार मगर यांनी पोलीस स्टेशन चे वार्षिक निरीक्षण करून पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांचे शीट वर रिमार्क केले असुन पोलीस अधिक्षक यांनी पोलिस कर्मचारी यांची बैठक  दरबार घेऊन त्यांच्या […]

रामटेक :श्री.नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथे राज्यशास्त्र, इतिहास तसेच राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त दोन दिवसीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या  उपक्रमाचे उद्घाटन डाॅ.ओमप्रकाश आष्टनकर यांनीं केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे या होत्या. डॉ. ओमप्रकाश आष्टनकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की अलीकडे भारतात सर्व सामान्यांची लोकतान्त्रिक मुले पायदळी तुडवली जातील अशा […]

नागपुर – सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 131 व्या स्मृतिदिना निमित्त आज बहुजन समाज पार्टीद्वारे कॉटन मार्केट परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, जेष्ठ नेते उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी शिंगारे, शहराध्यक्ष राजीव भांगे, मनपा पक्ष नेते जितेंद्र घोडेस्वार यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी बसपा नेत्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई […]

चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली.  लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेस ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून लसीकरण टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले […]

नागपुर – दि. २७/११/२०२१ रोजी कॅफे विला ५५,अंबाझरी येथे अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरु असल्याची पोलीस उपायुक्त विनिता साहू , परिमंडळ क्रमांक २ यांचे गोपनीय बातमिवरून सदर ठिकाणी  शनिवारी रात्री २३.३० वाजता झोन २ चे PSI कुणाल धुरट, पोशि आबा मुंडे, पोहवा प्रमोद अरखेल, पोहवा महेश बावणे,नापोशी जयंता नंदेकर , पोशि अनिश शेख, पोशि अतीब शेख, पोशि सुमर सिंह, यांनी रेड […]

तिडके‌‌ महाविद्यालयात मतदान नोंदणी शिबिराचे उद्घाटन रामटेक : श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालयं रामटेक येथील या मतदान नोंदणी शिबिराचे उद्घाटन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले. यानिमित्ताने राबवण्यात येणाऱ्या सप्ताहास  त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या उद्घाटनपर भाषणातून तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी संविधान दिनाची आठवण करुन देत संविधान निर्मिती करतांना ज्यांनी परिश्रम घेतले ते‌ लक्षात ठेवून राष्ट्र विकासात जबाबदार नागरिक म्हणून हातभार लावावा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com