नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ९ डिसेंबर) रोजी ०५ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर शुक्रवार दि.१० आणि शनिवार दि.११ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक सचिन परब यांनी ही मुलाखत घेतली आहे.             प्रबोधन नियतकालिकाला यंदा १०० वर्षे पूर्ण […]

 मुंबई : थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यावर आधारित लघुपट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिली.             प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे यंदा शताब्दी वर्ष सुरु आहे. या शताब्दी वर्षाचे […]

नागपूर : झाडांना खिळे ठोकून त्याद्वारे जाहिराती लावणा-यांविरुद्ध मनपाद्वारे कठोर पवित्रा घेण्यात आला आहे. झाडांना खिळे ठोकून जाहिरात, पोस्टर, भित्तीपत्रे लावणा-यांनी पुढील ३ दिवसांत सर्व जाहिरात काढण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. तीन दिवसानंतर ज्या जाहिरातदारांच्या जाहिराती झाडांवर दिसतील, त्यांच्यावर मनपाद्वारे पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र विरुपन प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश निर्गमित केले आहेत.             नागपूर […]

नागपुर – सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच 22 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या “मराठी इंडियन आयडॉल कार्यक्रमात नागपूरच्या कैवल्य विनय केजकर ला त्याच्या उत्कृष्ट सादारीकरणामुळे महाराष्ट्रातील रसिकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आणि या कार्यक्रमाचे परीक्षक नामवंत संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी सुद्धा त्याचे खूप कौतुक केलेले आहेत. आणि खुप खुप शुभेच्छा दिल्या. कैवल्याची घरची परिस्थिती वडिलांच्या प्रकृतीमुळे ढासळलेली आहे. मागील ९ महिन्यांपासून त्याचे बाबा […]

                                                                            * जल जीवन, स्वच्छ भारत मिशनचा आढावा                                 * नळाद्वारे बारा महिने  गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा                                 * मिशन म्हणून योजना पूर्ण करण्याचा संकल्प                                 * पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाला प्राधान्य                                 * प्रत्येक गावाचा स्वतंत्र आराखडा तयार […]

पहिला डोज :- आरोग्य सेवक                   – 49646 फ्रंट लाईन वर्कर       – 56956 18 + वयोगट           – 1110193 45 + वयोगट          – 364005 45 + कोमार्बिड       –  106541 60 + सर्व नागरिक   –  270574 पहिला डोज – एकूण : – 1957915 दूसरा डोज :- आरोग्य सेवक                   –  30432 फ्रंट लाईन वर्कर       –  39249 18 + वयोगट           –  598571 45 + वयोगट          –  311090 45 + कोमार्बिड       –  45597 60 + सर्व नागरिक   –  198891 दूसरा डोज – एकूण – 1223830 संपूर्ण लसीकरण एकूण : – 31,81,745

– वाहन सरगना गुप्ता सकते में  नागपूर –  वेकोलि बल्लारशाह कोयला खदानों मे वाहनापूर्ति का ठेका फर्म मेसर्सः बालाजी ट्रवल्स एजेंसी के श्रमिक आंदोलन की राह पर उतारु हो चुके हैं.  बताते है कि बालाजी ट्रवल्स एजेंसी के वाहन चालकों और क्लीनरों के साथ पिछले अनेक सालों से कंपनी मालक गुप्ता द्वारा श्रमिकों के साथ आर्थिक शोषण शुरु है. जिसमें […]

भंडारा :  माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी 7 डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्ह्याचा ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ दिप प्रज्वलन व शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करुन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिषद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. बारस्कर, वीरपत्नी व माजी सैनिक […]

भंडारा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये येत्या 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. पक्षकारांनी आपली तडजोड पात्र प्रकरणे मोठ्या संख्येने लोक अदालतीमध्ये निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख […]

नागपुर – मा. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन, मा. हेमंत गडकरीच्या प्रमुख उपस्थितीत तसेच दिनेश इलमे (नागपुर जिल्हा अध्यक्ष मनवीसे) ह्यांच्या पुढाकाराने व मनोज कहालकर(उत्तर विभाग अध्यक्ष) ह्यांच्या नेतृत्वात आज प्रभाग क्र १ मधील नावयुवकांनि मनवीसे मध्ये प्रवेश केला ह्या वेळी शाखेच्या फलक उदघाटन मा हेमंत गडकरीच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रभाग कार्यकारणी मध्ये ओम शाहु (प्रभाग अध्यक्ष) […]

कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आजपासून तातडीची मदत ·         उच्चस्तरीय बैठकीत निर्णय ·         ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ·         मनपा उघडणार विशेष केंद्र ·         सोपा अर्ज, तात्काळ प्रतिसाद ·         महाकोविड१९ रिलीफ डॉट इन संकेतस्थळ ·         कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही नागपूर  : कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बाधिताच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह निधी देण्याच्या शासनाच्या निर्णयाची उदयापासून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा व महानगरपालिका यंत्रणेला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे […]

नागपूर  :  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी शुक्रवार 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.        जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया व त्यानंतरच्या व्यवस्थेबाबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली. बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदान पेट्या बचत भवन येथील स्टॉगरूम […]

नागपुर – डॉ प्रशांत श्रीधर बोकारे यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी सध्या ओ.पी.जिंदाल विद्यापीठ, रायगड, छत्तीसगड येथील स्कुल ऑफ इंजिनीअरिंग येथे प्राध्यापक व अधिष्ठाता असलेल्या डॉ प्रशांत बोकारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.   डॉ प्रशांत बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. दिनांक  ७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू […]

नागपुर – संत तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने नागपूर शहर व जिल्हा बसपा तर्फे संत जगनाडे चौक नंदनवन येथील संताजीच्या पुतळ्याला आज बसपा चे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, जेष्ट नेते कृष्णाजी बेले, उत्तम शेवडे, महिला नेत्या वर्षाताई वाघमारे ह्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी संताजी के सम्मान मे बीएसपी मैदान मे, संताजी […]

  – सप्ताहादरम्यान मोफत तपासणी नागपूर दि.08 : सिकलसेल या गंभीर आजाराबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन  प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुगणालय, डागा स्त्री रुग्णालयात करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी या सप्ताहादरम्यान तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोगय अधिकारी  डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे. या सप्ताहादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, […]

मुंबई – ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महाराष्ट्राने सध्या 12 कोटीं 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले असून 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.  7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे.  18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85.25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे.  गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के […]

मुंबई – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातंर्गत असलेल्या  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ व  महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या स्थापनेमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींप्रमाणे शालेय शिक्षणासोबत कौशल्य शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू […]

मुंबई – राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी ज्या बहुउद्देशिय  सहकारी संस्था त्यांच्या सदस्यांना पीक कर्ज वितरीत करतात त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बाजार समितीवर नियुक्त करावयाच्या अशासकीय […]

मुंबई –  महाराष्ट्र राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विद्यावेतनावर इंटर्न म्हणून घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.  मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था कार्यरत आहेत. तेथे बी. एस्सी व एम. एस्सी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com