नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १० डिसेंबर) रोजी १० प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३६,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच पथकाने गांधीबाग झोन येथील ५ पतंग दुकानांनवर कारवाई करुन १३२ पतंगे जब्त केली आणि रु ५०००/- चा दंड केला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत एका दुकानामधुन ९० पतंग जब्त करुन रु १०००/- चा दंड वसूल […]

भंडारा : राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कायाकल्प पुरस्कार योजनेत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूरची निवड झाली आहे. दोन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या योजनेत राज्यातील सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सहभाग असतो. या योजनेत प्रथम येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दरवर्षी दोन लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता, देखभाल, संसर्ग […]

 अन्यथा साथरोग कायद्यानुसार होणार कारवाई   सौदी अरेबिया मधुन आलेल्या प्रवाशामुळे वाढली चिंता   सामान्य रूग्णालयात संशयीत रूग्ण दाखल   प्रलंबित डोस राहीलेल्यांनी लसीकरण करून घ्यावे भंडारा : जिल्ह्यात सौदी अरेबियामधून प्रवास करून आलेल्या संशयीत रूग्णाला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच संशयीत रूग्णाच्या निवासस्थानी प्रतिबंधीत क्षेत्र करण्यात आले आहे. जिल्हावासीयांची चिंता वाढवणारी ही बाब आहे. परदेशातून जिल्ह्यात आलेल्या […]

वीज उत्पादन पूर्ववत करण्यासाठी युद्धस्तरीय उपाययोजना फायर ऑडीट होणार नागपूर : महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात ८ डिसेंबर रोजी २१० मेगावाट परिसरात कोळसा वाहून नेणाऱ्या कन्व्हेयर बेल्टला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. या केंद्रातील विद्युत विषयक (ईलेक्ट्रिल) आणि अग्नीसुरक्षा विषयक (फायर) ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक(संचलन) […]

गिरणार चौक आणि बंगाली कॅम्प चौकात लसीकरण आणि मास्क बाबत चौकशी चंद्रपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात विना मास्क फिरणारे व लसीकरण न केलेल्या वाहनधारकांची तपासणी करण्यात आली. कोविड- १९ लस न घेतलेल्या व्यक्तींना करणास प्रवृत्त करण्यात आले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले […]

चंद्रपूर  : अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंत डांबरीकरण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पार पडले. चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूरच्या नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना निधीअंतर्गत १ कोटी ७० लख ५० हजार किमतीचे अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंत डांबरीकरण रस्ता विकसीत करण्यात येणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी महापौरांच्या हस्ते पार पडले. […]

कामठी – जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी- खापरखेडा मार्गावर  कामठी वरून खापरखेडा कडे जात असलेल्या मारोती व्हेन ने जबर धडक दिल्याने मोटारसायकलवरील तरुण जागीच ठार झाला तर  चालक तरुण गंभीर असल्याची घटना सकाळी 11 वाजता सुमारास घडली . जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत सुरेश हरोडे  वय 23 राहणार बिनाकी मंगळवारी नागपूर व त्याचा चुलत भाऊ पंकज यदुनाथ हारोडे […]

  • शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण • 12 केंद्रावर 100 टक्के मतदान • एक मतदार आयोगाकडून अपात्र • 560 पैकी 554 मतदारांचे मतदान • 14 डिसेंबरला मतमोजणी • बचत भवनात स्ट्राँग रूम नागपूर दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण 560मतदार होते. त्यापैकी 554 […]

नागपुर –  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पासून सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत 90 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण 560 मतदार असून तीन उमेदवार रिंगणात आहेत.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीत सहभाग नोंदवला. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना हातमोजे देण्यात आले. थर्मल स्कॅनिंगद्वारे तापमान […]

 नागपूर : कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रानचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास पुन्हा १५ डिसेंबर, २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी (१० डिसेंबर) रोजी जारी केले. याबाबत कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश १५ डिसेंबर नंतर जारी करण्यात येतील. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता ८ वी […]

नागपुर – रविंद्र भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नागपुरात काँग्रेसच्या गोटात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, आपण निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली […]

 नई दिल्ली – २०२० मध्ये एक्सप्रेसवेसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातात ४७,९८४ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुरुवारी संसदेत देण्यात आली. लोकसभेत लेखी उत्तर देताना, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की २०१९ मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातांमुळे ५३,८७२ लोकांचा मृत्यू झाला. गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, रस्ते अभियांत्रिकी, वेग, […]

नई दिल्ली –  कोरोनाचा नवा व्हेरिएं Omicron मुळे  शिथिल केलेले निर्बंध हळूहळू पुन्हा लागू होताना दिसत आहेत. आता ३१ जानेवारीपर्यंत सरकारने International Flights बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (DGCA) ने माहिती दिली आहे. त्यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्यांच्या पुन्हा एकदा निराशा पडली आहे. गुरुवारी रात्री DGCA एक आदेश जारी करून ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर […]

 नागपुर  – महाराष्ट्रात विधान परिषदेच्या २ जागांसाठी मतदान आज मतदान होणार आहे अकोला वाशिम बुलढाणा आणि नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या ६ जागांवर निवडणूक जाहीर केली होती. महाविकास आघाडी आणि भाजपच्या चर्चेतून ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. अकोल्यात शिवसेना विरुद्ध भाजप तर नागपूरमध्ये काँग्रेसनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा […]

फक्त दोन ओळखपत्राला मान्यता सकाळी 8 ते 4 मतदानाची वेळ एकूण 15 केंद्र ; 560 मतदार पसंतीक्रमाने होणार मतदान रिंगणात एकूण ३ उमेदवार कोविड प्रोटोकॉल अनिवार्य 14 डिसेंबरला मतमोजणी नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. एकूण 559 मतदार असून तीन उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला […]

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या नागपुरात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेस उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसनं डॉ. रविंद्र भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे. उमेदवार बदलाबाबत मागील दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर काँग्रेसनं आपला उमेदवार […]

चंद्रपूर : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि. ९) सायंकाळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रमुख प्रशासकीय इमारतीत सदिच्छा भेट दिली. यावेळी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील ९ डिसेंबर रोजी चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. दिवसभर खासगी आणि पक्षीय कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेला […]

– अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या सूचना  चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या हद्दीत सद्यस्थितीत ९४ टक्के नागरिकांनी कोविड-१९ची पहिली लस घेतली. उर्वरीत ६ टक्के नागरिकांचे लसीकरण येत्या १० दिवसात पूर्ण करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले.   ९ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक […]

-नितीन  गडकरींची दूरदृष्‍टी, मोदींनीही घेतली दखल नागपूर – युवकांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये खासदार क्रीडा महोत्‍सवांचे आयोजन केले पाह‍िजे असे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी संसदेत सर्व खासदारांना संबोधित करताना काही दिवसांपूर्वी सांगितले. पण नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीची अशा क्रीडा व सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे आयोजन करून आपल्‍या दूरदृष्‍टीचा परिचय दिला आहे, असे प्रत‍िपादन महापौर […]

मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्या अंतर्गत १५ पंचायत समित्या तसेच १०६ नगरपंचायतींमध्ये केवळ ओबीसींच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करून ऊर्वरित जागांवर निवडणूक घेण्यामुळे गंभीर पेच निर्माण होतील व त्यामुळे आयोगाने ही निवडणूक सरसकट स्थगित करावी, अशी मागणी बुधवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीचे आ. आशिष शेलार, आ. कॅप्टन तमिळ सेल्वन व आ. राजहंस सिंह […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com