जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम

मुंबईदि. 31 : सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत 01 ते दि. 28 फेब्रुवारी 2022  या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

            सन 2021-22 या वर्षात शैक्षणिकसेवानिवडणूक इतर कारणाकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रुटीअभावी संबधित समितीकडे प्रलंबीत आहेत. अशा विद्यार्थ्यांचे व अर्जदारांचे नुकसान होवू नये म्हणून ‘बार्टी’ कार्यालयाने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबवावे, असे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

            या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेतत्याबाबत संबंधित विद्यार्थ्यास व अर्जदारास त्यांच्या प्रकरणांतील त्रुटी पूर्तता करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना व अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्राप्त झालेले नाहीत्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे व मूळ कागदपत्रांसह दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत संबधित समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन श्री.धम्मज्योती गजभियेमहासंचालकबार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मध्ये श्री नरेंद्र तिडके महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार...... 

Mon Jan 31 , 2022
रामटेक:- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातीचे  कुलगुरू   प्रो.  मधुसदन पेन्ना यांनी सेनेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ येथे आलेल्या नॅक टीमला सैनिकी सलामी दिली. तसेच स्वयंशिस्तीची चांगले प्रदर्शन केल्याबद्दल कौतुक म्हणून विद्यापीठ प्रशासनाने छात्र सेनेचे विद्यार्थी, प्रशिक्षक लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब लाड, श्री नरेंद्र तिडके  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com