नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट कं, ०८, अंबाडे ले-आऊट, कोहीनूर सोसायटी, जरीपटका नागपुर येथे राहणारे फिर्यादी रजत राजु लाहोरीया, वय २६ वर्षे हे आपले राहते घराला कुलूप लावुन लाईफ लाईन हॉस्पीटल येथे त्यांचे सासुला पाहण्यासाठी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून, आलमारीत ठेवलेले रोख ५०,०००/-रू, व सोन्या-चांदीचे दागीने असा एकुण १,९७,३५०/- रु. या मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे पोउपनि, उदगिरकर यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.