अमली पदार्थ विरोधी मोहीम व्यापक पद्धतीने राबवा – जिल्हाधिकारी

भंडारा :- जिल्ह्यातील युवा पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी समितीला व्यापक मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधीकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी आज दिले आहेत. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीने प्रभावीपणे काम करावे. अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत नसल्याची खात्री करण्यासाठी तपासणी करा. गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. ते म्हणाले की, व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या आणि त्यांना असणाऱ्या व्यसनाधीनतेविषयीची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बंद असणाऱ्या कारखान्यांमध्येही अशा पदार्थांचे उत्पादन होत नसल्याची तपासणी वेळोवेळी करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

शाळा, महाविद्यालये, बगीचा, सिनेमागृह, कॉफी शॉप, हुक्का पार्लर, पर्यटन स्थळे, हॉटेल, लॉजिंग, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी परिसरात अंमली पदार्थांची विक्री होवू शकते. अशा परिसरावर विशेष लक्ष देवून अवैध कृती आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश कुंभेजकर यांनी या बैठकीत दिेले. दरम्यान, अंमली पदार्थांचे व्यसन लागलेल्या युवक, व्यक्तींना समुपदेशन करुन त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षण व पोलिस विभागाने शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम घ्यावी,असेही त्यांनी सांगितले.

अंमली पदार्थांचे उत्पादन, विक्री होताना आढळल्यास माहिती द्या

जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्षाकडे फोन करुन माहिती द्यावी. ही माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक मतानी यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील 4 व्यासनमुक्ती संघटना तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंतःकरणात निर्मळ असा भाव निर्माण करणारा श्रीमद भागवत कथा, आचार्य राममूर्ती मिश्र यांचे प्रतिपादन

Sat Dec 23 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- गेल्या 39 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या भागवत कथा सप्ताहास कॅन्टोन्मेंट कामठी येथे कन्हान नदीच्या तीरी असलेल्या योगासन ध्यान केंद्र महादेव घाट येथे स्वर्गीय प्रभुदत्त ब्रम्हचारी महाराज यांच्या प्रेरणेने येथील भागवत कथा सप्ताहाचा प्रारंभ 17 डिसेंबर ला करण्यात आला. गुरू ने दिलेल्या वचनाचा मान राखत आजपर्यंत कोरोना सारख्या काळात ही आचार्य राममूर्ती ह्यांनी येथे दरवर्षी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com