नागपूर :- नागपुरात दोन दिवसापूर्वी पासून टू व्हीलर वर बसनाऱ्याला सुद्धा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे हे अगदी अव्यवहार्य व जनतेला त्रासदायक आहे. त्यामुळे डबल हेल्मेट सक्ती रद्द करावी अशी मागणी बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.
अपघात झाल्यास मागे बसणाऱ्या चा मृत्यू होऊ नये यासाठी हेल्मेट सक्ती केल्याचे बोलले जाते. अपघाताची व त्यात मरण्याची अनेक कारणे आहेत. अपघातास नादुरुस्त रस्ते व विस्कळीत वाहतूक मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याने हेल्मेट सक्तीचा तुगलकी निर्णय मागे घ्यावा असे म्हटले आहे.
शासनाने व पोलिसांनी याकडे लक्ष देणे जरुरी असताना गाडीची कागदपत्रे व हेल्मेट तपासण्यास व वसुली करण्यास पोलिसांना वेळ कमी पडतो, तशीही पोलिसांची संख्या आधीच कमी आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुहेरी हेल्मेट सक्तीने जनता व पोलिसांमध्ये बेबनाव वाढेल त्यामुळे हा निर्णय तूर्तास शिथिल व कायमचा रद्द करावा.
औषधाविना, अन्नाविना, निवाऱ्याविना मरणाऱ्यांची तसेच गरीबीमुळे, महागाईमुळे व अज्ञानामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अपघाताने मरणाऱ्यापेक्षा जास्तीची आहे. त्यामुळे शासनाने ह्याकडे अधिकचे लक्ष द्यावे असेही बसपा नेते उत्तम शेवडे यांनी शासनाला आवाहन केले आहे.
– उत्तम शेवडे,मीडिया प्रभारी महाराष्ट्र प्रदेश बसपा