उपजिल्हा रुग्णालयात शिबिराच्या पहिल्याच दिवशी
५३० रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ…बहुतांश रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वी…
रामटेक :- राष्ट्रीय आरोग्य अज्ञान अभियानांतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात निःशुल्क वैद्यकीय, दंतरोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात ऐकून ५३० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.. बऱ्याच रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडल्या , शस्त्रक्रिया झालेल्यांना मोफत औषधी व जेवणाची सोय ,दिनांक २७ नोव्हेंबर पर्यंत शिबिराचा लाभ घ्यावे ,
तसेच दिनांक २७ नोव्हेंबर पर्यंत ला रुग्णांचा फॉलोअप घेण्यात येईल.
असे वैदकिय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे यांनी सांगितले…या शिबिरात वैदकिय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे ,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ चेतन नाईकवार , बधिकरण तज्ञ डॉ आली, शल्य चिकित्सक डॉ मानापुरे , सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सारिका जाजुलवार , डॉ अख्तर , शल्य चिकित्सक डॉ उमाटे , वैदिकिय अधिकारी डॉ हेमंत वर्के ,
त्वचा रोग तज्ञ डॉ धूर्वे, बालरोग तज्ञ डॉ विशाल कोडापे , स्त्रीरोग तज्ञ डॉ पूनम कंगाली , आयुर्वेद तज्ञ संगीता क्षिरसागर , यांचे सह परिचारिका यांचे सहकार्य लाभले…