नागपूर : गटई कामगारांना अस्मानी संकटापासून संरक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शंभर टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॅाल देण्याची योजना राबविण्यात येते. गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जासोबत अर्जदाराने स्वतःचा प्राधिकृत अधिका-याने दिलेला जातीचा दाखला, चालू वर्षातील प्राधिकृत अधिका-याने दिलेला उत्पन्नाचा दाखला (तहसीलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र), शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डची झेरॅाक्स (साक्षांकित प्रत), आधारा कार्ड झेरॅाक्स (साक्षांकित प्रत), अर्जदार ज्या जागेत स्टॅाल मागत आहे ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व छावणी क्षेत्र (कॅन्टॅानमेंट बोर्ड) यांनी भाड्याने, खरेदीने, स्वमालकीची असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी कराराची प्रत किंवा खरेदी क्षेत्राची साक्षांकित प्रत आवश्यक असणार आहे.
या योजनेकरीता इच्छुक लाभार्थी असतील त्यांनी 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरून त्याची एक प्रत समाज कल्याण कार्यालयात सादर करावी, असे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
@ फाईल फोटो