‘कृषी पुरस्कार 2023’ करिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नागपूर :- कृषी व संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था, गट आणि कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्काराने गौरविण्यात येणार असून वर्ष 2023 करिता नागपूर विभागातून जास्तीत- जास्त प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार यांनी केले आहे.

कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि गट यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार’, ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ ,’जिजामाता कृषीभूषण पुरस्कार’, ‘कृषिभूषण (सेंद्रिय शेती)पुरस्कार, ‘उद्यान पंडित पुरस्कार’, ‘वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार’, ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’, ‘युवा शेतकरी पुरस्कार’ तसेच कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांना ‘पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येते.

जास्तीत -जास्त गट, संस्था, व्यक्ती यांनी या कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. या पुरस्काराविषयी अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा, मंडल स्तरावर भाजपाची अधिवेशने - प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची माहिती

Thu Jul 25 , 2024
मुंबई :- पुणे येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अधिवेशनानंतर आता भाजपाच्या संघटनात्मक 78 जिल्ह्यांमध्ये 2,3 आणि 4 ऑगस्ट दरम्यान जिल्हा अधिवेशने आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार असून, पक्षाच्या मंडल रचनेतील सर्व 778 मंडलांमध्ये 9,10 आणि 11 ऑगस्ट दरम्यान अधिवेशने आणि बैठका होतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com