नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन

नागपूर :- आदिशक्तीची आराधना करणा-या ‘नवरात्र’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना पवित्र बौद्ध धर्माची दिक्षा दिलेल्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ च्या आगमनाला काही दिवसच शिल्ल्क असून हे दोन्ही उत्सव सर्वांना आनंददायी व निर्विघ्न पार पडावेत यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी धार्मिक उत्सवांसाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप, गरबा महाप्रसाद, रवण दहन तसेच धम्मचक्र प्रवर्त्न दिनानिमित्त्तने करण्यात येणारी रोषणाई, भोजनदान व इतर कार्यक्रमासाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक 24 तास सुरू असणारे निशुल्क क्रमांक 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 यावर संपर्क साधावा अथवा 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सार्वजनिक उत्सव मंडळांना महावितरणकडून जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. यासाठी मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरीक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल आणि राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.

अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत…

तात्पुरत्या वीजजोडणीसाठी मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास उत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे

सार्वजनिक सुरक्षा महत्वाची

· नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि इतरही धार्मिक आयोजनादरम्यान मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

· गरबा, जागर आदिचे आयोजन विद्युत यंत्रणेपासून लांब अंतरावर करावे.

· दस-या प्रसंगी होणारे रावण दहन हे मोकळ्या मैदानात आणि वीज यंत्रणेपासून लांब करावे, फ़टाक्यांची आतिषबाजी करतांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात.

· वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे.

· जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये,.

· वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अफ़ज़ल मीठा को व्यापार कूटनीति में योगदान के लिए प्रतिष्ठित "नाइट ऑफ़ माल्टा 2024" पुरस्कारों से सम्मानित

Fri Sep 27 , 2024
नागपुर :- ओरिएंट ग्रुप ऑफ़ होटल्स एंड रिसॉर्ट्स के प्रबंध निदेशक अफ़ज़ल मीठा को हाल ही में माल्टा सरकार द्वारा प्रतिष्ठित “नाइट ऑफ़ माल्टा 2024” पुरस्कार से सम्मानित किया गया है। यह सम्मान श्री मीठा के “व्यापार कूटनीति” में महत्वपूर्ण योगदान और अंतर्राष्ट्रीय व्यापार साझेदारी को बढ़ावा देने में उनकी महत्वपूर्ण भूमिका को दर्शाता है। यह पुरस्कार, जो माल्टा द्वारा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com