पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली :- राज्याच्या ग्रामिण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वंयरोजगाराचे साधन उपर्लबध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांकव्दारे ग्रामिण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातुन ग्रामिण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोगाराचे साधनउपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तीक लाभाच्या योजनाअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता या बरोबर जिल्हसस्तरीय विविध योजनासाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-22 पासुन पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

त्यानुसार नाविण्यपुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअतर्गत दुधाळ गाई / म्हशीचे गट वाटप करणे, शेळी / मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कूट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे,100 कुक्कूट पिलांचे वापट व 25+3 तलंगा वट वाटप या योजनासांठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे.पशुपालकांना डेअरी,पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार यवक / युवती वा महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ: http.//ah.mahabms.com ,ॲड्रॉइंड मोबाईल ॲप्लिकेशनचे नांव: AH.MAHABMS (Google Play स्टोरवरील मोबाईल ॲपवर उपलब्ध), अर्ज करण्याचा कालावधी: 13/12/2022 ते 11/01/2023, टोल फ्री क्रमांक: 1962 किंवा 1800-233-0418

योजनांची संपुर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दत याबाबतचा संपुर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणी बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलु नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांने पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्यात दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय,तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.असे आवाहन डॉ.विलास गाडगे,जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,गडचिरोली व डॉ. सुरेश कुंभरे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद,गडचिरोली यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फुलोरा अवस्थेपासूनच करा तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

Fri Dec 16 , 2022
गडचिरोली :- सद्य परिस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी तुरीवरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीस पोषक असल्यामुळे सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येऊ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com