शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई :- राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटुंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि. १४ ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत व दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यात यावेत.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली २०२३ विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडु, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू / व्यक्ती यांच्याद्वारा दि. १५ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई उपनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

India's March Towards Becoming a Major Maritime Power - Prime Minister Narendra Modi

Thu Jan 16 , 2025
– Warship, Vessels, and Submarine Simultaneously Dedicated to the Nation Mumbai :- Prime Minister Narendra Modi stated that the commissioning of the Nilgiri warship, Surat vessels, and Vagsheer submarine is a historic event connecting Indian Navy’s glorious traditions with future aspirations. He emphasized that this marks India’s progression towards becoming a major maritime power, significantly strengthening India’s security and progress. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!