वाघाच्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी

– बोरडा (सराखा) येथील घटना

रामटेक :- तालुक्यातील ग्रामीण भागात वाघाचा धुमाकूळ वाढलेला दिसून येत आहे. नुकतेच नाहबी गावात वाघाने एका 65 वर्षीय इसमाला शिकार केल्याची थरारक घटना घडली होती. त्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशातच बोरडा सराखा गावालगत असलेल्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासराला वाघाने जखमी केल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, बोरडा येथील रहिवासी कवडू चिंदू गजबे यांच्या शेतातील गोठ्यात 2 बैल, 2 गाय व 1 वासरू बांधले होते. अचानक अंदाजे रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास वाघाने गोठ्यात शिरून वासराला शिकार बनविण्याचे प्रयत्न केले. मात्र वाघाला त्यात यश आले नाही. वासराच्या मानेला खूप मोठ्या प्रमाणात जखम झाली असून त्याचे उपचार सुरू आहे. मानेला खोलपर्यंत जखम असल्याने वासरु वाचेल याची शाश्वती फार कमी दिसून येत आहे. एकाएकी गावालगत असलेल्या शेतात येऊन वाघाने शिकार केल्याच्या घटनेने संपूर्ण बोरडा गाव देखील भीतीच्या वातावरणात असल्याचे चित्र आहे.

संबंधित घटनेची माहिती वनविभाग रामटेक यांना देण्यात आली.मनसर येथील क्षेत्र सहाय्यक गजानन शेटे,वनरक्षक राठोड,वनमजुर रामू कोकोडे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

गंभीर सवरूपात जखमी झालेल्या वासराच्या उपचाराचा संपूर्ण खर्च वनविभागाने उचलावा अशी गरीब शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच गावाजवळच अशी घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण असून या वाघाचे देखील बंदोबस्त तात्काळ करण्यात यावे अशी मागणी यावेळी बोरडा ग्रामवासीयांनी प्रतिनिधीसमोर बोलतांना केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अन्यायाची शिदोरी गोवारांच्या पदरी, केव्हा मिळेल न्याय, या सरकारच्या दरबारी

Thu Nov 24 , 2022
28 व्या शहीद वर्धापन दिनानिमित्त नागपूर : गोवारी हत्याकांडाला आज एकूण 28 वर्षे पूर्ण झाले तरीही आदिवासी बांधवांना न्याय मिळालेला नाही गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी, आदिवासी लोक मोर्चा काढतात, आंदोलन करतात, परंतु आज पर्यंत न्याय मिळाला नाही ? १९९४ पासून ४ ते ५ सरकार बदलले तरीसुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही. गोवारी बांधव आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आंदोलन करतात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com