नागपूर – केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील क्षेत्रीय कौशल विकास पुनर्वसन व दिव्यांगजन सशक्तिकरण केंद्र-सीआरसी नागपूर, अली यावर जंग नेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्पीच अंड हेअरींग मुंबई यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बालक व त्यांच्या मातांसाठी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर येथे जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले होते.
या जंगल सफारीला जिल्हा परिषद नागपूर चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमल किशोर फुटाणे यांनी हिरवी झेंडी दाखवून यशवंत स्टेडियम येथून सीआरसी नागपूरच्या कार्यालयातून रवाना केले.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर येथे पोहचल्यावर या बालकांचे स्वागत सीआरसी नागपूरचे संचालक प्रफुल शिंदे यांनी आले. यावेळेला बालकांनी जंगल सफरीचा मनसोक्त आनंद घेतला. कार्यक्रमाला सीआरसी नागपूरचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.