यशोधरानगरात 56 हजार 200 रुपयांची घरफोडी.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 30:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यशोधरा नगर येथिल एका कुलूपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने संधी साधून दाराचे कुलूप तोडून घरात सुरक्षित ठेवलेले नगदी 15 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 56 हजार 200 रुपयांची घरफोडी झाल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी माया मानवटकर वय 58 वर्षे रा यशोधरा नगर कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी ह्या यशोधरा नगर कामठी येथील राहत्या घरातून काही कामानिमित्त नजीकच्या हरदास नगर येथे गेले असता अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून घराच्या दाराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले नगदी 15 हजार रुपये,41 हजार 200 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 56 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असता यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आपली ओळख ही आपल्या कामातून होत असते-पोलीस निरीक्षक दीपक भिताडे..

Sun Jul 30 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे निरोप समारंभ कामठी ता प्र 30 :- सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणारे पोलीस खाकी वर्दीतून आपली कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असतात ही कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असताना पोलिसांचे नागरी संबंध वृद्धीने वाढतात .आणि नागरिकांशी वाढलेला हाच जनसंपर्क कर्तव्यात मदतशीर ठरत असतो.काम करतेवेळी समस्या निर्माण होणारच तेव्हा या समस्यांना न घाबरता प्रत्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com